Metro 
पुणे

रुंदीकरणानंतर मेट्रो खांब उभारणी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिका आणि महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत बोपोडी येथील पुणे-मुंबई महामार्ग रुंदीकरणाच्या कामामध्ये रस्ता दुभाजक आणि मेट्रोच्या मार्गाची जागा पाहणी करून निश्‍चित केली. महापालिकेने येथील रस्ता रुंदीकरणाचे काम गतीने केल्यास, या भागातील मेट्रोचे खांब उभारणीचे काम महिन्यात हाती घेण्यात येईल, असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

‘खडकीतील मेट्रोचे काम रखडले’ ही बातमी ‘सकाळ’मध्ये बुधवारी (ता. २५) प्रसिद्ध झाली. त्यामुळे महापालिका आणि महामेट्रोच्या प्रशासनाने वेगाने हालचाली करीत काल तातडीने बोपोडीतील रस्ता रुंदीकरणाच्या कामाची पाहणी केली. संरक्षण विभागाकडून रस्ता रुंदीकरणाला, तसेच मेट्रोच्या कामाला अद्याप मान्यता मिळालेली नाही. मात्र, हॅरिस पुलापासून खडकी कॅन्टोन्मेंटची हद्द सुरू होईपर्यंत सुमारे नऊशे मीटर रस्ता पुणे महापालिकेच्या हद्दीत आहे. महापालिकेच्या हद्दीतील २१ मीटर रस्त्याचे ४२ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, या रस्त्यावरील बोपोडी चौकातील पाच जागा अद्याप महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन अधिकाऱ्यांकडील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. त्या जागांचा ताबा मिळाल्यानंतर हे रुंदीकरण पूर्ण होईल.

भूसंपादन अधिकाऱ्यांकडून जागा ताब्यात मिळाल्यानंतर, तातडीने रस्ता रुंदीकरण पूर्ण केले जाईल. सत्तर टक्के जागा महापालिकेच्या ताब्यात असून, तेथील काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. खडकी रेल्वेस्थानकाची संरक्षक भिंत रस्त्याच्या बाजूने दहा फूट पुढे असल्यामुळे रस्ता दुभाजकाची जागा निश्‍चित करण्यात अडचण आली होती.
- दिनकर गोजारे, कार्यकारी अभियंता, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पुण्यातील तापमानात चढ-उतार कायम; पुढील दोन दिवस हवामान स्थिर

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

UPSC CSE 2026 New Rule : यूपीएससीने नियम बदलला! आता 'या' उमेदवारांना एकदाच देता येणार परीक्षा...

Pune Mumbai Flight : पुणे-मुंबई विमानसेवा ‘जमिनीवर’, कंपन्यांची उदासीनता; वेळ चुकीची असल्याने प्रवाशांची पाठ

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT