Mahametro  sakal
पुणे

Wagholi Metro: CM शिंदेंचं पुणेकरांना गिफ्ट ! वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गाला मंजुरी

वनाज- रामवाडी हा १६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आता कार्यान्वित झाला आहे.

मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे - वनाज ते रामवाडी मार्गावर वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या नव्या विस्तारीत एलिव्हेटेड मेट्रो मार्गांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पांना सोमवारी मंजुरी देण्यात आली. आता केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर या विस्तारीत मेट्रो मार्गांवर काम सुरू होईल.

वनाज- रामवाडी हा १६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आता कार्यान्वित झाला आहे. या मार्गावर रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च रोजी उदघाटन झाले. आता या मार्गावर विस्तारीत मेट्रो मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ३ हजार ७५६ कोटी ५८ लाख रुपये खर्च होणार आहे.

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कर्ज, या माध्यमातून या निधीची उभारणी होणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे आता केंद्र सरकारच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड (पीआयबी) यांच्यापुढे या प्रकल्पाचे सादरीकरण होईल. तेथे मंजुरी मिळाल्यावर हा प्रकल्प रेल्वेखात्यामार्फत केंद्र सरकराच्या मंत्रिमंडळापुढे अंतिम मंजुरीसाठी पोचेल. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल.

- वनाज ते चांदणी चौक - अंतर १.१२ किलोमीटर - २ स्थानके होणार

- रामवाडी ते वाघोली - अंतर ११.६३ - किलोमीटर - ११ स्थानके होणार

‘शहराचा औद्योगिक विकास आणि विस्तारही वेगाने होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या विस्तारीत मेट्रो मार्गांमुळे उपनगर शहराशी जोडले जाईल,’.

- उपमुख्यमंत्री, अजित पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT