कर्वे रस्ता - एसएनडीटी महाविद्यालय ते स्वातंत्र्य चौकादरम्यान डबल डेकर उड्डाणपूल होणार असून, त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. 
पुणे

पुण्यात ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने केली सुरुवात

सकाळवृत्तसेवा

पुणे - अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील ‘डबल डेकर’ पूल उभारण्यास महामेट्रोने आता सुरुवात केली आहे. त्यासाठीच्या १५ खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. जमिनीपासून सुमारे १८ मीटर उंचीवर हा पूल असेल.

वनाज-रामवाडी मार्गावरील मेट्रो मार्गावर सर्वाधिक वर्दळीचा नळस्टॉप चौक आहे. त्या चौकात गर्दीच्या वेळेत दर तासाला सुमारे १० हजार वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे या चौकात वाहनांसाठी उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रोमार्ग, असा डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल उभारण्याची चर्चा गेल्या दहा वर्षांपासून सुरू होती. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानंतर तेथून मेट्रो मार्ग जाणार असल्यामुळे हा डबल डेकर महामेट्रोने उभारायची तयारी दर्शविली. त्यासाठीचा निधी महापालिकेने त्यांना देण्याचे कबूल केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मार्गावर पुढील वर्षी मार्च अखेर आनंदनगर ते गरवारे महाविद्यालयादरम्यान मेट्रो धावणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या १५ खांबांची उभारणी महामेट्रोने केली असून पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे यांनी दिली. 

उड्डाणपुलाचा असा होणार फायदा 
नळस्टॉप चौकात सिग्नलसाठी थांबल्यावर नागरिकांना सध्या १२० सेकंद थांबावे लागते. गर्दीच्या वेळात हा वेळ आणखी वाढतो. वाहनांसाठीचा उड्डाण पूल झाल्यावर वाहनचालकांना नळस्टॉप चौकात थांबावे लागणार नाही. त्यांना थेट दशभुजा गणपती चौकापर्यंत जाता येईल. तसेच नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीही कमी होऊ शकेल, असा महामेट्रोचा होरा आहे.

असा असेल पूल 

  • कर्वे रस्त्यावर स्वातंत्र्य चौक ते एसएनडीटी (बीएसएनएल समोर) दरम्यान होणार पूल 
  • पुलाची लांबी - ५४६ मीटर, रुंदी - ६ मीटर रुंदीचे दोन मार्ग 
  • जमिनीपासून उड्डाण पुलाची उंची ८ मीटर, त्यावर ११ मीटर उंचीवर मेट्रो मार्ग
  • पुलाचा खर्च - सुमारे ५५ कोटी (महामेट्रो ३० कोटी, महापालिका २५ कोटी) 
  • पुलाचे काम पूर्ण होण्याचा कालावधी - सुमारे दोन वर्षे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT Fina IPL 2026: RCB vs GT आयपीएल 2026 फायनलमध्ये महामुकाबला; बंगळूर की गुजरातची? डबल बारी कोणाची?

Hasan Mushrif vs Shivaji Patil : 'शिवाजीराव मुक्त गोकुळ त्यांना करायचे का?' महायुतीच्या गोकुळमधील पॅनेलवर आमदार शिवाजी पाटलांनी केले वक्तव्य

Latest Marathi News Live Update : क्रीडा, आरोग्य आणि सुदृढतेबाबत शिक्षण दिले, तर त्याचा खूप मोठा फरक पडेल- अभिनेता सुनील शेट्टी

Pune Crime: 'माझा गुन्हा का दाखल केला नाही?' संतापलेल्या महिलेचा पोलिस चौकीत धिंगाणा, वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा

Mumbai : पावसाने रस्ते निसरडे झाले, अपघातामुळे वाहनांच्या रांगा; तर ओव्हर हेड वायर तुटून मध्य रेल्वेचाही खोळंबा

SCROLL FOR NEXT