पुणे

आसू - महाराजस्व समाधान शिबिरात दुसरा टप्पा संपन्न

CD

महाराजस्व अभियानातून नागरिकांचे ‘समाधान’

सचिन पाटील; आदर्की येथील शिबिरात एकाच छताखाली मिळाले विविध दाखले

आसू, ता. २२ ः महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात आणि रहिवासी प्रमाणपत्र, तसेच घररपट्टे वाटप, अशा विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येत असल्याचे नागरिकांचे समाधान होत आहे, असे प्रतिपादन आमदार सचिन पाटील यांनी केले.

फलटण तालुक्यातील सर्व १० महसूल मंडलांमध्ये दोन टप्प्यांत समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्की बुद्रुक महसूल मंडलात भैरवनाथ मंदिर, आदर्की बुद्रुक येथे आयोजित शिबिरात ते बोलत होते. यावेळी भैरवनाथ संस्था समूहाचे प्रमुख बाळासाहेब कासार (मोहोळकर), सुरेश भोईटे, पै. बजरंग गावडे, सहआयुक्त पुनर्वसन नंदकुमार कोष्टी, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव, प्रभारी गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक जायपत्रे उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, ‘‘यापूर्वी शासन आपल्या दारी योजनेंतर्गत आपण तालुकास्तरावरील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावागावांत जाऊन तेथील सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेऊन जागेवरच त्याची सोडवणूक केली आहे, त्यानंतर आता दीड-दोन महिन्यांत शासन या समाधान शिबिरांच्या माध्यमातून आपल्या भागात पोहोचत आहे, त्या माध्यमातूनही आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावे. यापूर्वी आपल्या प्रश्नांसाठी तालुक्यात हेलपाटे मारूनही अधिकाऱ्यांची भेट झाली नाही तर वेळ व पैसा वाया जात होता. मात्र, आता अधिकारीच आपल्या दारात पोहोचत असल्याने युतीचे शासन अत्यंत उत्तम पद्धतीने लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करीत आहेत.’’

विशेषतः सातबारा उताऱ्यावरील नोंदी अद्ययावत करणे, जमीनविषयक प्रलंबित फेरफारांची पूर्तता करणे, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासाचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक विविध प्रमाणपत्रे या शिबिरांमधून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तरडगाव, होळ, वाठार निंबाळकर, फलटण महसूल मंडलात समाधान शिबिर झाले. यावेळी ग्रामस्थ यांच्यासह ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, कृषी सहाय्यक आणि शेतकरी उपस्थित होते.

02634
आदर्की : समाधान शिबिरात मार्गदर्शन करताना सचिन पाटील, समवेत डॉ. अभिजित जाधव, प्रकाश बोंबले, नंदकुमार कोष्टी, प्रियांका आंबेकर आणि इतर.

-----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

SCROLL FOR NEXT