पुणे

खंडाळा - छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर पारगाव मध्ये

CD

पारगावमध्ये शनिवारी
‘महाराजस्व’ शिबिर
खंडाळा, ता. ५ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत खंडाळा मंडलातील महसूल विभागातील सातबारा, फेरफार, रेशनकार्ड व इतर कामे तत्काळ मार्गी लावण्यासाठी तहसील विभागाकडून शनिवारी (ता. सात) विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर पारगाव (ता. खंडाळा) येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये खंडाळा मंडळातील सर्व गावांच्या खातेदारांना त्यांच्या सातबाऱ्यामधील अडीअडचणी दूर करून घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहेत. मयत खातेदारांच्या वारसांना वारस नोंदी, विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्न दाखले, जातीचे दाखले, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) तरतुदी मार्गदर्शन, ॲग्री स्टॅक योजनेंतर्गत शिल्लक खातेदारांची नोंदणी, दुबार रेशन कार्ड युनिट कमी करणे व वाढवणे असे महसूल विभागातील विविध कामे मार्गी लावण्यात येणार आहे. तरी खंडाळा मंडळातील सर्व खातेदारांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सुहास थोरात व मंडल अधिकारी तुषार भांगे यांनी केले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थकारणाचा आरसा समोर येणार! आर्थिक सर्वेक्षणानंतर मुख्यमंत्री मोठा अर्थसंकल्प मांडणार; भर कशावर?

जमीनधारकांना गुड न्यूज! जमीन रूपांतराचा नियम बदलला; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कुणाला फायदा होणार?

Latest Marathi News Live Update : सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाचा तीव्र आंदोलनाचा इशारा; महापौर पदावरून वाद चिघळला

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

SCROLL FOR NEXT