पुणे

भिगवण अपहरण प्रकरणाला नवे वळण

CD

भिगवण, ता. २५ : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाने बुधवारी (ता.२५) वेगळे वळण घेतले. संबंधित २१ वर्षीय तरुणीस बुधवारी (ता. २५) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंदापूर न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर या तरुणीने आई व मामा समवेत राहण्याची इच्छा व्यक्त केली. या तरुणीस आई व मामाकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती भिगवणचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
भिगवण येथील बाजारपेठेमध्ये लग्नाची खरेदी करून आई व भावासमवेत घराकडे परतत असताना डोळ्यात मिरचीपूड टाकून २१ वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद भिगवण पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करून हिंदुत्ववादी संघटनांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याची व मुलीला आईच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. मोठा गदारोळ झाल्यानंतर संबंधित तरुणी शुक्रवारी (ता. २०) बारामती शहर पोलिस ठाण्यात हजर झाली होती व आपले अपहरण झाले नसून स्वमर्जीने संबंधित तरुणासमवेत गेल्याचे सांगत आईसोबत जाण्यास नकार दिला होता. दरम्यान, विनोद महांगडे म्हणाले की, सुधारगृहात असलेल्या तरुणीस बुधवारी(ता.२५) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंदापूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने विचारणा केल्यानंतर तरुणीने आई व मामाकडे जाण्याची व राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर इंदापूर न्यायालयाने आदेश दिले आहेत. पुढील तपास भिगवण पोलिस करीत आहेत. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचे हिंदुत्ववादी संघटनाकडूनही समाधान व्यक्त होत आहे.

संवेदनशील प्रकरणाची पोलिसांकडून योग्य हाताळणी
कथित अपहरण प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अतिरिक्त अधीक्षक गणेश बिरादार, सहायक निरीक्षक विनोद महांगडे व पोलिस प्रशासनाच्या वतीने योग्य हाताळणी केली. सर्व प्रथम संबंधित तरुण व तरुणीस बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर केले. तरुणीने नातेवाइकांसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तरुणीची सुधारगृहात रवानगी केली. पाच दिवसांनी तरुणीने आई व मामासमवेत राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्याच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील ठरलेल्या या प्रकरणाची पोलिसांकडून योग्य हाताळणी केल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT