पुणे

नोंदणीकृत सेवादात्यांकडूनच कृत्रिम रेतन करण्याचे आवाहन

CD

पुणे, ता. ६ : गाई-म्हशींच्या वंश सुधारणेसाठी, तसेच प्रजनन प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन (विनियमन) अधिनियम, २०२३ ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांचे कृत्रिम रेतन केवळ अधिनियमांतर्गत नोंदणीकृत सेवादात्यांकडूनच करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले.
रेतन केंद्रे, भ्रूण प्रत्यारोपण केंद्रे, कृत्रिम रेतन प्रशिक्षण संस्था आणि सेवा पुरवठादारांची महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाकडे नोंदणी बंधनकारक आहे. तसेच, केवळ प्रमाणित आणि उच्च वंशावळीच्या वळूंच्या गोठविलेल्या विर्यामात्रांचा वापर करणे आवश्यक आहे. नोंदणीशिवाय गोजातीय प्रजनन सेवा देणे किंवा अप्रमाणित विर्यामात्रांचा वापर केल्यास एक लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. विहित मानकांचे पालन न केल्यास ५० हजार रुपयांपर्यंत दंड, तर चुकीची किंवा दिशाभूल करणारी जाहिरात केल्यास सहा महिन्यांपर्यंत साधा कारावास किंवा दोन लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. शेतकऱ्यांनी कृत्रिम रेतनाची सेवा घेण्यापूर्वी संबंधित तंत्रज्ञाचा नोंदणी क्रमांक तपासावा आणि केवळ प्रमाणित विर्यामात्रांचा वापर होत असल्याची खात्री करावी. अनियमितता आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT