file photo sakal media
पुणे

Pune : ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर आज कडक पोलिस बंदोबस्त

महाविकास आघाडीने बंदची हाक दिली असून त्यामध्ये महाआघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, त्यांचे घटक पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालून चिरडल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महाविकास आघाडीने सोमवारी (ता. ११) ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. यादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी सोमवारी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीने बंदची हाक दिली असून त्यामध्ये महाआघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, त्यांचे घटक पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाचे आयोजन केले आहे. संबंधित बंद शांततेत पार पडावा, यासाठी पुणे पोलिसांकडूनही पुरेशी काळजी घेण्यात आली आहे. पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी बंदोबस्ताबाबतचा आदेश काढला आहे.

त्यानुसार, दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त, दोन पोलिस उपायुक्त, आठ सहाय्यक पोलिस आयुक्त, १३ पोलिस निरीक्षक, ७६ सहायक पोलिस निरीक्षक, ८७ पोलिस उपनिरीक्षक यांच्यासह तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी नेमले आहेत. डॉ. शिसवे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी झाली आहे. बंदमध्ये सहभागी झालेले पक्ष, संघटनांशी समन्वय ठेवला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये विशेष सुविधा; खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

शिवसेना कुणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदेंना धक्का बसणार? ठाकरेंच्या वकिलांचा तगडा युक्तिवाद

ODI World Cup 2027: सुनील गावस्करांनी वन डे वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ निवडला; ६ फलंदाज, ४ ऑलराऊंडर अन् ५ गोलंदाज

STAR PRAVAH NEW SHOW: उठा, सूठा आणि मला बेटावर भेटा! स्टार प्रवाहवर येतोय नवा कार्यक्रम; प्रोमो पाहिलात का?

Latest Marathi News Live Update : फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले

SCROLL FOR NEXT