Maharashtra Bandh At Junnar
Maharashtra Bandh At Junnar  
पुणे

Maratha Kranti Morcha जुन्नरला शांततेत बंद

दत्ता म्हसकर

जुन्नर : सकल मराठा समाजाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनास जुन्नरला नागरिक व व्यावसायिकांनी आज गुरुवारी ता. 9 ला सकाळ पासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठात शुकशुकाट दिसत होता. तालुक्यातील जुन्नर, ओतूर, नारायणगाव, आळेफाटा येथील एस. टी. बससेवा, कृषी उत्पन्न बाजार समिती, आठवडे बाजार, शाळा, महाविद्यालये, दुकाने शंभर टक्के बंद राहिल्याने सर्वत्र कडकडीत बंदचे वातावरण दिसत होते. अत्यावश्यक सेवा फक्त सुरू होत्या. सरकारी कर्मचाऱ्यांचे संपामुळे कार्यालये ओस पडली होती त्यात बंद असल्याने कोणी या कार्यालयात फिरकले नाही. अनेक ठिकाणी नागरिकांनी रस्त्यावर येण्याचे टाळले. रस्ते वाहनांच्या अभावी मोकळे दिसत होते.

सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सकाळी 9 वाजल्यापासून शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ जमू लागले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जय जिजाऊ जय शिवराय आशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता यानंतर बस स्थानकाजवळ ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आपली पाळीव जनावरे देखील येथे आणून बांधली. परिसरातील विविध गावच्या भजनी मंडळींनी भजने सादर केली. या आंदोलनास विविध संस्था, संघटनांनी पाठींबा दिला. आंदोलकांना चहा, पाणी, नाश्ता आदी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. यावेळी पेपर डिश, कप आदीचा झालेला कचरा गोळा करण्यात आला. आंदोलना दरम्यान रुग्णवाहिका आल्यास रस्ता मोकळा करून दिला जात होता. पोलिस निरीक्षक सुरेश बोडखे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT