vidyadhar anaskar and vijay dhere sakal
पुणे

महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनवर विद्याधर अनास्कर, विजय ढेरे

कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे हे पुणे विभागातून निवडणूक लढवीत होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

सकाळ वृत्तसेवा

कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे हे पुणे विभागातून निवडणूक लढवीत होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती.

पुणे - अत्यंत चुरशीच्या झालेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनच्या निवडणुकीत पुणे-नगर- सोलापूर मतदारसंघातून फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष विद्याधर अनास्कर आणि पुणे मर्चंट्स को-ऑप. बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे हे निवडून आले. अनास्कर यांना सर्वाधिक मते मिळाली.

कॉसमॉस को-ऑप. बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे हे पुणे विभागातून निवडणूक लढवीत होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. पुणे विभागात दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ४४ पैकी ४३ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी दोन मते बाद झाली. उर्वरित ४१ मतांपैकी अनास्कर यांना ३२ मते, ढेरे यांना २० मते, मिलिंद काळे यांना १९ मते आणि आनंद गावडे यांना १० मते मिळाली. ढेरे यांना काळे यांच्यापेक्षा केवळ एक मत जास्त मिळाल्याने ते निवडून आले.

फेडरेशनची निवडणूक बिनविरोध करण्याचे विद्यमान संचालकांनी निश्चित केले होते. त्यानुसार सर्वानुमते २१ पैकी १२ जागा बिनविरोध पार पाडल्या. परंतु उर्वरित ९ जागांवर अर्ज मागे न घेतल्यामुळे निवडणूक घेण्यात आली.

निवडणूक झालेल्या ९ जागांपैकी मुंबई येथील ३, पुणे येथील २ आणि कोकण विभागातील १ अशा एकूण सहा जागांवर अनास्कर यांच्या पॅनेलला विजय मिळाला.

राज्यातील नागरी सहकारी बँकांचे पालकत्व स्वीकारलेल्या महाराष्ट्र अर्बन को-ऑप फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यभर मतदान झाले होते. १४ नोव्हेंबर रोजी फेडरेशनच्या वडाळा येथील कार्यालयात मतमोजणी पार पडली.

मतमोजणीत आम्हाला मिळालेली मते ही राज्यातील नागरी सहकारी बँकांनी आमच्या कामाची दिलेली पोचपावती आहे. मतदारांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही.

- विद्याधर अनास्कर, अध्यक्ष- महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT