पुणे

'आदित्य ठाकरेंना मुलगी हवी असेल, तर उद्धव ठाकरे...'

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

दीनानाथ परब

पुणे: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandra kant patil) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांना संभाजी राजेंच्या खासदारकीच्या राजीनाम्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. संभाजी राजेंनी मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) विषय सुटला नाही तर राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. (Maharashtra bjp president chandra kant patil salm maha vikas aghadi govt)

त्यावर "पहिला मुद्दा व्यक्तीगत विषय आहे. त्यांनी राजीनामा देऊन कशावर परिणाम होणार आहे, हे माहित नाही. महाराष्ट्र सरकार हे एक कोडगं सरकार आहे. त्यांनी ठरवलय काही ऐकून घ्यायचं नाही. आता ओबीसी आरक्षणाच्या विषयावर छगन भुजबळ बोलत असताना सारखे केंद्र, केंद्र करत होते. आता आदित्य ठाकरेंना मुलगी हवी असेल, तर उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींना पत्र लिहितील. तिथे दिल्लीत मुलगी असेल तर बघा" असा टोला त्यांनी लगावला.

"संभाजी राजेंच्या खासदारकीच्या राजीनाम्याने कोणावर परिणाम होणार नाही. आमच्या पक्षात निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे" असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. आज जळगावमध्ये खासदार रक्षा खडसे यांना भेटले. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, "पवार साहेब आजारी आहेत. कमी लोकांना भेटायला परवानगी आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंना विनंती करुन ही भेट घेतली असेल. पवारसाहेबांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी ही भेट होती." तसचं "जळगाव जिल्ह्यात केळीबागांचं मोठं नुकसान झालय, त्यासाठी देवेंद्र फडणवीस खासदार रक्षा खडसे यांना भेटले" असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

"ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही मागास आयोग नेमला पाहिजे. जिल्हानिहाय डाटा गोळा करुन, तो सुप्रीम कोर्टात मांडावा लागेल, पुन्हा OBC आरक्षण मिळू शकतं" असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT