maharashtra board class 5th and 8th student result 2024 on monady education Sakal
पुणे

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या पाचवी आणि आठवीच्या मूल्यमापनाचा निकाल सोमवारी होणार जाहीर

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळातर्फे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा ऑनलाइन निकाल येत्या सोमवारी (ता.६)  दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांचा निकाल ‘www.msbos.mh-ssc.ac.in’ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) आणि इयत्ता आठवी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन १२ ते ३० मार्च या कालावधीत करण्यात आले. या मूल्यमापनाचा निकाल आता सोमवारी जाहीर होणार आहे.

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या निकालांची प्रत (प्रिंटआऊट) संकेतस्थळावरून घेता येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी पाचवी किंवा आठवीपर्यंतची अर्हता आणि विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र लवकरच वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे प्रभारी सचिव माणिक बांगर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

Success Story: २ खोल्यांचे घर, ४ भावंडांचे यूपीएससीत यश! कुणी आयएएस तर कुणी आयपीएस बनले

SCROLL FOR NEXT