महाराष्ट्रासाठी ९८ हजार कोटींचा निधी
गेल्या वर्षीच्या तुलनेत १०,३१२ कोटींची वाढ
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ : केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला २०२५-२६ या वर्षात जवळपास एक लाख कोटी रुपये मिळतील. नव्या आर्थिक वर्षात केंद्रीय करातून महाराष्ट्राला ९८,३०६ कोटी रुपये मिळतील. ही रक्कम मागील वर्षीच्या तुलनेत १०,३१२ कोटी रुपयांनी अधिक आहे. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या विकास प्रकल्पांसाठी १२,३३५ कोटी रुपये मिळणार आहेत.
सोळाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय करातून राज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात ४१ टक्के निधी मिळणार आहे. हा निधी एकूण १५,२६,२५४.५८ कोटी रुपये आहे. त्यातील सर्वाधिक निधी उत्तर प्रदेशला (२,६८.९१०.७५ कोटी रुपये), बिहार (१,५१,८३१.८० कोटी रुपये), मध्य प्रदेश (१,१२,१३३.९३ कोटी रुपये), पश्चिम बंगाल (१,१०,११९.२७ कोटी रुपये) या राज्यांना मिळणार आहे. तर महाराष्ट्राला ९८,३०६.०६ कोटी रुपये मिळतील. महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीपैकी कंपनी करातून २८८५७.९४ कोटी, प्राप्तिकरातून ३४,९८४.४९ कोटी, केंद्रीय जीएसटीमधून २६,८८६.६५ कोटी रुपये मिळतील. या व्यतिरिक्त सीमाशुल्क आणि केंद्रीय उत्पादन शुल्कातून अनुक्रमे ५२४४.९३ कोटी रुपये आणि २२३४.३४ कोटी रुपये; तसेच ९७.७१ कोटी रुपये इतर करांमधून मिळतील.
मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे राज्याच्या जीडीपीत मोठी वाढ होईल. पुणे-हैदराबाद कॉरिडॉरचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला मोठा लाभ होईल. याशिवाय ग्रोथ हबसाठी पाच वर्षांत ५००० कोटी रुपये मिळणार असून, त्याचा फायदा मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथ हबला होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
...
केंद्रीय करातून महाराष्ट्राला ९८,३०६ कोटी रुपये मिळणार असून, राज्यातील विविध प्रकल्पांसाठी असलेली १२,३५५ कोटी रुपयांची तरतूद पाहता राज्याला तब्बल एक लाख कोटी रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पात नियोजनबद्ध शहरीकरणाला, उद्योगक्षेत्राला आणि गुंतवणूक व रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
...
महाराष्ट्राला विविध प्रकल्पांसाठी मिळणारा निधी
(रुपये)
महाराष्ट्राला योजनानिहाय मिळणारा निधी : १२,३५५ कोटी
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते प्रकल्प : ३७८.३८ कोटी
महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस प्रकल्प : १६७.२८ कोटी
सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : २८३.७७ कोटी
महाराष्ट्र टर्शरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रम : ३८५.७८ कोटी
उपसा सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण : २०७.१० कोटी
शेती आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प : ६४६.२४ कोटी
मानवी विकासासाठी कौशल्य आणि अप्लाईड नॉलेज प्रकल्प : ३१३.६५ कोटी
जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमतावृद्धीसाठी : २४०.९० कोटी
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरिडॉर : ६१०३ कोटी
मुंबई मेट्रो : १७०२ कोटी
एमयूटीपी ३ : ४६२ कोटी
एमएमआरमध्ये ग्रीन मोबिलिटी : १५५.३२ कोटी
समृद्धी महामार्गावर आयटीएस : ६८०.७९ कोटी
पुणे मेट्रो : ५१७.७४ कोटी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.