पुणे

राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती प्रवर्गातील ''अ-ब-क-ड'' उपवर्गीकरण लागू करावे.

CD

अनुसूचित जाती प्रवर्गातील उपवर्गीकरण लागू करावे

आमदार अमित गोरखे; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही सरकार गप्प का?

दहिवडी, ता. २८ : सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाअंतर्गत उपवर्गीकरण करण्यासंदर्भात निकाल दिला. या निकालानंतर राज्य सरकारांना अनुसूचित जाती आणि जमातींमधील आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या समाजाला उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ देता येणार आहे. तेलंगणा उप-वर्गीकरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे; परंतु महाराष्ट्र राज्यात मात्र अजून यासंदर्भात कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. अनुसूचित जाती प्रवर्गातील ५९ पोटजातींना आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळवून देण्यासाठी ''अ-ब-क-ड''नुसार उपवर्गीकरण तातडीने लागू करावे. राज्य सरकारने येणाऱ्या काळात यावर सकारात्मक पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आमदार अमित गोरखे यांनी दहिवडीत दिला आहे.
आमदार गोरखे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या घटनापीठाने अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणात ''उप-वर्गीकरण'' करण्यास कायदेशीर मान्यता दिली आहे. मग राज्य सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास विलंब का लावत आहे? मातंग, चर्मकार, वाल्मिकी, मादिगा समाजासह ५९ जाती या आदेशाची वाट पाहात आहेत. आरक्षण हा केवळ धोरणात्मक विषय नसून तो वंचित समाजाच्या भविष्याचा प्रश्न आहे. माझा लढा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ आरक्षणाला १००% न्याय मिळवून देण्यासाठी आहे. जर आरक्षण
मिळूनही ५९ पोटजातींमधील माझे बांधव शिक्षण आणि नोकरीपासून वंचित राहात असतील, तर त्यांच्या हक्कासाठी मी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.’’
आमदार गोरखे पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर, महाराष्ट्रातील ५९ उपजातींपैकी, ज्यांना अद्याप आरक्षणाचा योग्य लाभ मिळालेला नाही, अशा अत्यंत मागास उपजातींना   प्राधान्य मिळण्यासाठी अ-ब-क-ड वर्गीकरण लागू करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या निर्णयानुसार अंमलबजावणी करावी. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या कामात होणारा विलंब टाळून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून उपेक्षित समाज मुख्य प्रवाहात येईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

Ajit Pawar: ‘दादा परत या...’ बारामतीकरांची आर्त हाक; महिन्यानंतरही भावना ताज्याच

Uttarakhand Holi: होळीच्या रंगात न्हाली देवभूमी,धामींची कोट्यवधींच्या प्रकल्पांची मोठी भेट पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन?

12th Student Death : नियतीचा क्रूर खेळ! बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा Heart Attack ने मृत्यू; परीक्षेपूर्वी 'असं' काय घडलं? हातात पेन घेण्यापूर्वीच...

SCROLL FOR NEXT