पुणे

डिसेंबरमध्ये सीईटीच्या पहिल्या सत्रातील परीक्षा

CD

पुणे, ता. १५ : राज्यात सध्या एकीकडे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सीईटी परीक्षा सुरू असतानाच, दुसरीकडे २०२७-२८ या शैक्षणिक वर्षातील सीईटी परीक्षेबाबत महत्त्वाच्या निर्णयाची तयारी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) सुरू केली आहे. पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या तिन्ही अभ्यासक्रमांतील २०२७-२८ मधील पहिल्या सत्रातील सीईटी परीक्षा डिसेंबर २०२६ मध्ये घेण्यात येणार असून, त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे.
प्रवेश परीक्षेला होणारा विलंब टाळणे, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावरील अन्य परीक्षा, तसेच बारावीच्या परीक्षेची तयारी तणावमुक्त वातावरणात करता यावी, या उद्देशाने हा निर्णय सीईटी कक्षाने घेतला. सीईटी परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील (राज्य मंडळ) असल्याने त्यांच्या शैक्षणिक वेळापत्रकाचा विचार करून हे नियोजन केले जात आहे.
राज्य मंडळाची बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होत असते. त्यापूर्वी जानेवारी महिन्यात जेईई मेनच्या पहिल्या सत्राची परीक्षा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेईई मेन, बारावी आणि सीईटी अशा सलग एकापाठोपाठ होणाऱ्या परीक्षांची तयारी करावी लागते. यामुळे मानसिक ताण वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येतात. या पार्श्वभूमीवर सीईटीच्या पहिल्या सत्रातील परीक्षा डिसेंबरमध्ये घेतल्यास विद्यार्थ्यांना नियोजनबद्ध तयारीसाठी अधिक वेळ मिळेल. तसेच, प्रवेश प्रक्रियाही वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले. साधारणतः १५ डिसेंबर २०२६ ते १५ जानेवारी २०२७ या कालावधीत पहिल्या सत्रातील सीईटी परीक्षा घेण्याचा सीईटी कक्षाचा मानस आहे.

पीसीएम, पीसीबी आणि एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दोनदा सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दोनदा परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा आणि बारावीच्या परीक्षेची तयारी स्वतंत्रपणे करता येईल, तसेच प्रवेश प्रक्रियेलाही विलंब होणार नाही, अशा उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मधील सीईटीचे नियोजन करण्यात येत आहे.
- दिलीप सरदेसाई, आयुक्त, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झारखंड विद्यार्थी आंदोलनापुढे सरकार झुकलं! JSSC CGL परीक्षा रद्द; मुख्यमंत्री सोरेन यांची मोठी घोषणा

Karad News : कऱ्हाडचे अमोल होमकर सीआरपीएफचे महानिरीक्षक; संवेदनशील मणिपूर, नागालँडची जबाबदारी

Koregaon News : वडिलांची चित्रकला जपतोय मुलगा! बारावीतील अवधूत साकारतोय अनेक मान्यवरांची हुबेहूब पोर्ट्रेट

Donald Trump: इराणशी गुप्त चर्चेमागे कोण? ट्रम्प प्रशासनाने IRGC पर्यंत कशी पोहोच मिळवली? सीक्रेट कनेक्शन आलं समोर

MPSC Exam : जिद्द अन् परिश्रमातून यश; कंद यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड

SCROLL FOR NEXT