पुणे

नगर

CD

जिल्हा बॅंक सभासदांच्या
खाती ६२७.४७ कोटी जमा

अहिल्यानगर, ता. १४ ः महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा बँकेच्या २७७ शांखा मार्फत १३६६ प्राथमिक विकास सेवा संस्थेच्या ६६ हजार १४७ थकीत पिक कर्जदार सभासंदाना त्यांच्या खाती शासनामार्फत मिळालेले ६२७.४७ कोटीची रक्कम जिल्हा बँके मार्फत जमा करण्यात आली आहे, अशी माहिती अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक संगिता डोंगरे यांनी दिली.
आधार प्रमाणीकरणासाठी शासनाकडून मिळालेल्या पहिल्या यादीतील १ लाख १६ हजार ५१२ कर्जदार सभासदांपैकी आज अखेर १ लाख ०५ हजार २२८ सभासदांनी आधारप्रमाणीकरण पूर्ण केलेले ११ हजार २८४ शेतकरी सभासदांचे आधारप्रमाणीकरण मयत, अँग्रीस्टक फार्मर आयडी नसणे, परगावी/स्थलांतरीत, बायोमॅट्रिक कॅप्चर न होणे, व इतर कारणांमुळे प्रमाणीकरण झालेले नसल्याने प्रशासकांनी पाठपुरावा करुन आधारप्रमाणीकरण करुन घेण्याची प्रक्रिया चालू आहे. आधारप्रमाणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत असलेल्या सर्व शेतकरी सभासदांना बँके मार्फत आधारप्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करुन घेण्याचे अवाहन केले आहे.
जिल्हयातील सचिव व त्यांची यत्रंणा आणि बँक कर्मचारी तसेच सर्व तालुका सहनिबंधक (सहकारी संस्था) व सर्व शासकीय लेखापरिक्षक यांच्या आभार बँकेचे प्रशासक डोंगरे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा विशेष लेखापरिक्षक गौतम निकाळजे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Vaishanavi Girse : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी', सासरच्या छळाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने स्वत:ला संपवलं

SCROLL FOR NEXT