पुणे

आणखी १० तालुके दुष्काळी

CD

आणखी दहा तालुके ‘दुष्काळी’

एक कोटी शेतकऱ्यांना अग्रिम मदत वितरित; डिसेंबरमध्ये पुढील रक्कम

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून, आणखी १० तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करण्यात येणार आहे. यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील तालुक्यांचा समावेश आहे. दरम्यान, दुष्काळी मदतीची पाच हजार रुपयांची अग्रिम रक्कम एक कोटी शेतकऱ्यांना मिळाली असून, १० लाख शेतकऱ्यांची रक्कम विविध कारणांमुळे रखडल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल यांनी दिली.
दरम्यान, राज्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून, एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे देण्यात येणारी वाढीव रक्कम एकाच वेळी न देता, दोन हजार रुपयांची मदत हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला (६ डिसेंबर) जाहीर होण्याची शक्यता आहे. उर्वरित रक्कम प्रतिमहिना वितरित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
राज्यात अवर्षणामुळे दुष्काळाची दाहकता वाढत आहे. याआधी सरकारने ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांतील एक कोटी १० लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या रकमेपैकी पाच हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित होते. यापैकी एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांत रक्कम जमा झाली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांतील त्रुटींमुळे रक्कम जमा झालेली नाही. शेतकऱ्यांची माहिती जमा करण्यासाठी कर्जमाफीची रक्कम वितरित झालेली कर्जखाती, नमो शेतकरी महासन्मान निधीची खाती, शेतकरी ओळख क्रमांक, महसुली नोंदी आदींचा वापर करण्यात आला. मात्र, जे शेतकरी मृत झाले आहेत आणि ज्यांची वारस नोंद झालेली नाही, संयुक्त खाते असल्याने एकाच खातेदाराला रक्कम मिळणे, तसेच मागील वर्षभरात ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यात अडचणी आल्या आहेत. परिणामी, १० लाख शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम वितरित करण्यात अडचणी येत असल्याची माहिती सिंगल यांनी दिली.

तालुक्यांच्या समावेशासाठी दबाव
राज्यात दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेजारचे तालुके दुष्काळी ठरले आणि अन्य तालुके वगळण्यात आल्याने दबाव वाढला आहे. संबंधित तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, यासाठी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे आज (ता.१७) होणाऱ्या दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीत आणखी १० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे. राजकीय दबावापोटी या तालुक्यांना दुष्काळी जाहीर करण्यात येणार आहे.

प्रस्ताव आठवड्यात
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) मदतीच्या दरांत वाढ करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाने पहिला १७ हजार कोटी रुपयांचा आणि दुसरा ३१ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. दुसऱ्या प्रस्तावात पीक नुकसान, पशुधनासाठी चारा, पिण्याचे पाणी, रोजगार हमीची कामे, शैक्षणिक शुल्क आदींचा समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागाने पीक नुकसानीपोटी १५ हजार ३८६ कोटी १९ लाख रुपये, पशुधनाच्या चाऱ्यासाठी नऊ हजार कोटी रुपये आणि उर्वरित कामांसाठी निधीची मागणी केली आहे.

सॅटेलाइट इमेजरीची अडचण
राज्यात अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत मॉन्सूनच्या काळात ३० दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा तुटवडा होता. मात्र, या काळात एखाद्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या हे तालुके दुष्काळ यादीतून वगळण्यात आले आहेत. तसेच नुकसान भरपाईसाठी सॅटेलाइट इमेजरी (उपग्रह छायाचित्रे) वापरली जात आहेत. यात पिके हिरवी असली, तरी त्यांना फळधारणा झालेली नाही. फळधारणा झाली असली, तरी ती पक्व झालेली नाही. उपग्रह छायाचित्रांत या बाबी दिसत नसल्याने अशा पिकांचा नुकसानभरपाईत समावेश होत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने या त्रुटी काढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : राज्यातील दुष्काळमुक्तीसाठी सरकारचा व्यापक कृती आराखडा; खाणींतील पाणी शेतीसाठी वापरणार, १५ लाख शेतकऱ्यांना 'फार्मर आयडी'चा लाभ - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

SCROLL FOR NEXT