Ajit Pawar 
पुणे

'शिवभोजन'च्या उद्धाटनावेळी अजित पवारांच्या प्रश्नांनी पिकला हशा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन थाळीला आज (रविवार) अनेक ठिकाणी सुरवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील शिवभोजन केंद्राच्या उद्घाटनावेळी विचारलेल्या प्रश्नांवर हे केंद्र चालविणाऱ्यांची भंबेरी उडाल्याचे पाहायला मिळाले, तर उपस्थितांमध्ये हशा पिकल्याचे दिसले.

पुण्यातील पोलिस ग्राउंडवर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर अजित पवार यांनी शिवभोजन केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आयुक्त उपस्थित होते. उद्घाटनावेळी अजित पवार यांनी विचारलेल्या गमतीशीर प्रश्नांमुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अजित पवारांनी या केंद्राच्या उद्घाटनापूर्वी फित कापण्यापूर्वी, हे हॉटेल कुणाचं आहे? इथं किती जणांना जेवण दिलं जातं? गरजू ,गरीब कसे ओळखणार? काही लोक मुद्दाम साधे कपडे घालून येतील..., असे काही प्रश्न विचारलेल्या चालकांची चांगलीच भंबेरी उडाली. अखेर अजित पवार यांनी उद्धाटनाचा कार्यक्रम उरकल्याचे पाहायला मिळाले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCA Election: शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणूकीत!

Royal Enfield New Bike : रॉयल एनफील्डची 'हिमालयन माना ब्लॅक एडिशन' लाँच; EICMA 2025 दिसली खास झलक, पाहा जबरदस्त फीचर्स अन् किंमत

फडणवीसांच्या खात्यावर पैसेच नसतात, आमदार म्हणून मिळतात ते कुठे जातात माहिती नाही : अमृता फडणवीस

IND vs AUS: 'आग आहोत आम्ही आग...', अभिषेक शर्मा शुभमन गिलसोबतच्या बाँडिंगबद्दल नेमकं काय म्हणाला?

Government Scrap: भंगार होतं की कुबेराचा खजाना! भंगार विक्रीतून मोदी सरकारची तब्बल ₹४१०० कोटींची कमाई; एवढा मोठा नफा कसा मिळवला?

SCROLL FOR NEXT