पुणे

पाणीअभावी फुलशेती धोक्यात

CD

PNE26W59705

अहिल्यानगर ः अकोळनेर (ता. नगर) येथे पाणीटंचाईमुळे कोमेजलेली फुलशेती.

दुष्काळाने हिरावला फुलांचा सुगंध!

फुलशेती संकटात; काही फुले जळाली, उरलेली जगविण्यासाठी टँकरचा आधार

अहिल्यानगर, ता.१७ ः जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे. खरीप पूर्णपणे वाया गेला आहे. पाऊसच न झाल्याने शेतीला पाणी नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना थोडीफार आशा फुलशेतीकडून होती. दसरा-दिवाळी सणांना फुलांना चांगला बाजारभाव मिळतो. पण यंदा पाणीटंचाईमुळे टॅंकरने फुलशेती जगवायची वेळ आली आहे. त्यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट होणार आहे. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना फुलशेतीसाठी टॅंकरला अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. काही फुलशेती, तर पूर्णपणे जळून गेली आहे.

अकोळनेरसह परिसरातील गावे (ता. अहिल्यानगर) राज्यासह देशात फुलांचे आगार म्हणून ओळखले जाते. या गावासह परिसरात एक हजार ते बाराशे एकरपर्यंत फुलशेती दरवर्षी केली जाते. यामध्ये झेंडू, शेवंती, अस्टर, गलांडा, निशिगंध, गुलाब आदी फुलांचा समावेश आहे. दसरा आणि दिवाळी सण डोळ्यासमोर ठेवून ही शेती केली जाते. मात्र, यंदा जून ते सप्टेंबर पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची स्थिती आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने फुलशेती संकटात सापडली आहे. फुलांना दसऱ्याच्या सणाला चांगला भाव मिळेल, या आशेने टॅंकरच्या पाण्यावर जगवले जात आहे. मात्र, टॅंकरच्या पाण्यामुळे यंदा उत्पन्नाचे अर्थकारण बिघडले आहे. टॅंकरच्या पाण्यावर फुलशेती जगेल, पण उत्पन्नात घट होणार आहे.
......
राज्याबाहेरून असते मागणी
अकोळनेर, चास परिसरातील गावांमधील शेवंतीसह इतर फुलांना परराज्यातून मोठी मागणी असते. तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यांतील व्यापारी फुलखरेदीसाठी अहिल्यानगरच्या बाजार समितीत दरवर्षी येतात. त्यामुळे फुलांना चांगला भाव मिळतो. यंदा उत्पन्नात घट होणार असल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

...................
आमच्या अकोळनेर गावात यंदा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. एक ते दीड हजार क्षेत्रावरील फुलशेती संकटात सापडली आहे. अनेक शेतकरी टॅंकरच्या पाण्यावर शेती जगवत आहेत. मात्र, त्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांच्या शेतीतील फुले पाण्याअभावी जळाली आहेत.
-प्रतीक शेळके, सरपंच, अकोळनेर, ता. नगर

.............
झेंडूच्या शेतीसाठी मोठा खर्च केला आहे. मात्र, पाणीटंचाई असल्याने पीक सोडून देता येईना. दर आठवड्याला ३५ हजार लिटरचे दोन टॅंकर सुरू आहेत. त्यासाठी १४ हजार रुपयांचा खर्च येत आहे. दसऱ्यापर्यंत हा खर्च करायचा आहे. त्यानंतर कसा भाव मिळतो, त्यावर फायदा झाला की तोटा ते कळेल. सध्या मात्र दर आठवड्याला १४ हजार रुपये खर्च टॅंकरवर करावा लागत आहे.
-नवनाथ इंगळे, देऊळगाव सिद्धी, ता. नगर

.............
झेंडूचा भाव सध्या ६०-७० रुपये, अस्टर २०० च्या पुढे, तर शेवंती १०० रुपये प्रतिकिलो गेला आहे. हे भाव येत्या दोन दिवसांत वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. पण टॅंकरच्या पाण्यावरील अतिरिक्त खर्चामुळे उत्पन्नाला चांगलाच फटका बसणार आहे, तसेच पाण्याअभावी उत्पादनावरही मोठा परिणाम झाला आहे.
-पोपट कार्ले, चास, ता. नगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

FDA Action : मुदतबाह्य, खराब अन्नपदार्थांच्या साठ्याची विल्हेवाट संशयास्पद; रिलायन्स रिटेल, ब्लिंकिटला ‘एफडीए’चा दणका

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, सव्वा नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Beed News : बीडमध्ये महायुतीच्या सभेत भाजपच्या दोन आमदारांची दांडी; पंकजाताईंच्या टोमण्याने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT