पुणे

आरोग्य केंद्रांतील मोफत चाचण्यांचा पेच

CD

पुणे, ता. २८ : राज्यातील आरोग्‍य विभागाच्‍या तब्‍बल दोन हजार प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये बाह्यस्त्रोतांद्वारे पुरविण्‍यात येणाऱ्या मोफत रक्तचाचण्यांची सुविधा बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या सुविधा आरोग्‍य विभाग पुरविणार असल्याचे म्‍हटले असले तरी, विभागाकडे पुरेशा सामग्री व सुविधांचा अभाव असल्याने सर्वसामान्यांना मिळणाऱ्या चाचण्‍यांच्‍या सुविधांवरच गंडांतर येण्‍याची शक्‍यता आहे.
राज्यात २० ते ३० हजार लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. अशा दोन हजारांहून अधिक केंद्रांमध्ये २०१७ पासून ‘एचएलएल लाइफ केअर लिमिटेड’ या खासगी कंपनीमार्फत मोफत रक्तचाचण्यांची सुविधा पुरविली जाते. सुरुवातीला राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि २०२१ पासून १५ व्या वित्त आयोगातून या चाचण्यांची देयके दिली जात आहेत. मात्र, निधी अपुरा पडत असल्याने ही सुविधा बंद करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र आरोग्य विभागाच्या सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व दवाखाने) डॉ. सरिता हजारे यांनी राज्यातील सहा आरोग्‍य परिमंडळांच्‍या उपसंचालकांना व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पाठवले आहे.

रुग्णांना फटका बसण्याची भीती
बाह्यस्त्रोतांद्वारे मिळणारी ही सेवा बंद झाल्यानंतर आरोग्य विभाग स्वतः या चाचण्यांची सुविधा देणार असल्याचा दावा करत आहे. मात्र, अनेक केंद्रांमध्ये अद्याप आवश्यक मनुष्यबळ आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रुग्णांना निदानासाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये पैसे खर्च करावे लागण्याची भीती आरोग्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे ग्रामीण भागातील हजारो रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

या चाचण्या संबंधित केंद्रांच्या स्वतःच्या प्रयोगशाळांमध्ये इन-हाउस पद्धतीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या उपकरणांची खरेदी १५ व्या वित्त आयोगामार्फत करण्यात आली आहे. देयके थकीत असल्याने हा निर्णय घेतला आहे.
- डॉ. सरिता हजारे, सहसंचालक, आरोग्य विभाग, मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

PBKS vs RR Live: स्टॉयनिसने लाज वाचवली! पंजाबला दोनशेपार पोहोचवले; राजस्थानच्या गोलंदाजांनी केला होता करेक्ट कार्यक्रम

SCROLL FOR NEXT