पुणे

‘गट-क’ परीक्षेच्या तारखेमध्ये बदल

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. ६ : महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ च्या तारखेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी तीन जानेवारी २०२७ रोजी नियोजित असलेली ही परीक्षा आता २४ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना १३ ते २७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज व विकल्प सादर करता येणार आहेत. वाढीव पदसंख्येमुळे नव्याने अर्ज स्वीकारणे आणि यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांकडून विकल्प घेण्यासाठी पुरेसा कालावधी देणे आवश्यक असल्याने परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. पदसंख्येतील वाढ आणि परीक्षा योजनेतील बदलासंदर्भातील शुद्धिपत्रके आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवारांनी या शुद्धिपत्रकानुसार पुढील कार्यवाही करावी, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी पाच हजार ७०७ पदांसाठी जाहीर झालेल्या या परीक्षेत आता आणखी ११ हजार १० पदांचा समावेश करण्यात आला असून, एकूण १६ हजार ७१७ पदे भरली जाणार आहेत. विद्यमान तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी एकच संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला अभ्यासक्रम लागू राहणार असून परीक्षा ऑफलाइन (ओएमआर) पद्धतीने घेण्यात येईल.
सामान्य शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या गट-क सेवेतील प्रशासकीय संवर्गांच्या मुख्य परीक्षेचे आयोजन विहित परीक्षा योजना व अभ्यासक्रमानुसार करण्यात येणार आहे. विशिष्ट शैक्षणिक अर्हता आवश्यक असलेल्या तसेच नव्याने समाविष्ट झालेल्या संवर्गांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येणार असून, संबंधित संवर्गांचा अभ्यासक्रम प्राधान्याने तयार करून आयोगाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT