Exam esakal
पुणे

Health University : आरोग्य विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेचा तिसरा टप्प्यास मंगळवारपासून सुरवात

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, विद्यापीठाचे अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून (ता.२७) सुरवात होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, विद्यापीठाचे अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवारपासून (ता.२७) सुरवात होत आहे.

राज्यातील विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालयातील एकूण १७१ परीक्षा केंद्रावर २७ जून ते ९ ऑगस्ट या कालावधीत विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.

यामध्ये एम.बी.बी.एस, बी.डी.एस, बी.ए.एम.एस, बी.यु.एम.एस, बी.एच.एम.एस, बी.एस्सी नर्सिंग, बेसिक बी.एस्सी नर्सिंग, बी.पी.टी.एच, बी.ओ.टी.एच, बी.पी.ओ, बी.ए.एस.एल.पी. आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमातील एम.डी.एस, डिप्लोमा डेन्टेस्ट्री, एम.डी./एम.एस, आयुर्वेद आणि युनानी, एम.डी. होमिओपॅथी, डिप्लोमा आयुर्वेद, एम.ओ.टी.एच, एम.ए.एस.एल.पी, एम.एस्सी, एम.पी.ओ तसेच बी.पी.एम.टी, एम.पी.एच, एम.बी.ए, एम.फिल, बी. ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑप्टोमेट्री, डिप्लोमा ऑॅप्थाल्मिक, डिप्लोमा पॅरामेडिकल, पी.जी. डि.एम.एल.टी., सी.सी.एम.पी., एम.एम.एस.पी.सी. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहेत.

तसेच येत्या गुरुवारपासून (ता.२९) होणाऱ्या परीक्षा बकरी ईदची  सार्वजनिक सुट्टी असल्याने वेळापत्रकानुसार त्या दिवसाच्या सर्व परीक्षा शुक्रवारी (ता.३०) घेण्यात येणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी दिली आहे.

याबबतीत अडचणी किंवा सूचना असल्यास विद्यार्थ्यांनी केंद्र समन्वयक यांच्याशी संपर्क साधावा अथवा विद्यापीठाचे अधिकृत ‘www.muhs.ac.in’ संकेतस्थळावर परीक्षासंदर्भात माहिती प्रसिद्ध केली असल्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात मोठी उसळी! सेन्सेक्स 1,300 अंकांनी वाढला; Vedanta Limited शेअर्स चर्चेत

'अरे काय हे' एका खलनायिकेसाठी १३ नायिका एकत्र, ठरलं तर मग मालिकेत महासंगम, नेटकरी म्हणाले, ' झुंड में सुवर आते हे शेर अकेला...'

Latur News: आयपीएल सट्टाप्रकरणी चौघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Beed News: थांबणार नाही रेल्वेचे इंजिन; सर्व पेच सुटले; जिल्हाधिकाऱ्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन; शेतकऱ्यांशी संवाद साधत समस्यांवर तोडगा

Organ Donation: अंतिम निरोपातून होतेय आशेची नवी पहाट; कऱ्हाडच्या सहा जणांचा मृत्यूनंतरही देहदानातून जिवंत राहण्याचा संकल्प, माणुसकीचा नवा आदर्श!

SCROLL FOR NEXT