पुणे

विद्युत कंपन्या राष्ट्रीय स्पर्धा

CD

म्हाळुंगे, बालेवाडी ः श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खो-खोच्या पुरुष गटात महावितरण संघ आणी हरियाणा पॉवर संघ यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यातील एक चुरशीचा क्षण.
-----------------

खो-खोमध्ये महावितरण संघाला जेतेपदाचा मान
विद्युत कंपन्या राष्ट्रीय स्पर्धा

पुणे, ता. ९ ः अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत खो-खोच्या पुरुष गटात कर्णधार प्रतीक वाईकरच्या नेतृत्वाखालील महावितरण संघाने विजेतेपद मिळविले. तर बास्केटबॉलमध्ये पंजाब संघाने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली.
एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित म्हाळुंगे, बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या या स्पर्धेत पुरुषांमध्ये महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवले. अंतिम लढतीत महावितरण संघाने हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणी एक डाव राखून विजय प्राप्त केला. यांत भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतीक वाईकरसह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटीलने केलेल्या जोरदार खेळाचा होता. महावितरणाच्या महिला संघानेही राजस्थान संघाचा पराभव करून विजेतेपद मिळविताना खोखोमध्ये दुहेरी मुकुट संपादिला.
बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पंजाब संघाने हरियाणा संघाचा ४५-३० असा पंधरा गुणांनी पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. पंजाब संघाच्या विजयात हरप्रितसिंगचा मोलाचा वाटा होता. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत महावितरण संघाने राजस्थान संघाचा २३-२१ असा केवळ दोन गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठेने यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.
कबड्डीच्या पुरुष विभागात महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६-१० असा २६ गुणांनी तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८-२८ असा २० गुणांनी पराभव केला होता.
--------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT