पुणे

नटरंग सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी प्रथम क्रमांकाची मानकरी

CD

YSH26B05107
अकलूज (ता. माळशिरस) : राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे बक्षीस नटरंग कला केंद्र ग्रुप पार्टीच्या कलाकारांना प्रदान करताना आमदार दिलीप सोपल, संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील, स्वरूपाराणी मोहिते- पाटील व इतर मान्यवर.
---
नटरंग सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टीची बाजी
रोख तीन लाखांचे पारितोषिक; राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
अकलूज, ता. ३ : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मोडनिंब येथील नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, ग्रुप पार्टी यांनी प्रथम क्रमांक पटकावत रोख तीन लाख रुपये व सन्मानचिन्ह मिळविले.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने अकलूज येथे आयोजित दोन दिवसीय स्पर्धेचा समारोप उत्साहात झाला. यावेळी आमदार दिलीप सोपल, समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते- पाटील, स्पर्धा समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते- पाटील, परीक्षक डॉ. शशिकांत चौधरी, प्रा. चं. वी. जोशी, प्रा. मधुकर गायकवाड, सहकारमहर्षी कलावंत पुरस्कर्ते पांडुरंग घोटकर, रेश्मा परितेकर, प्रमिला लोदगेकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शशिकांत चौधरी यांनी, टाळ आणि चाळ, भक्ती आणि शृंगार या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, त्यातून महाराष्ट्र उजळला आहे, असे सांगितले. मागील ३० वर्षांपासून जयसिंह मोहिते- पाटील यांनी लावणी स्पर्धेचे शिवधनुष्य पेलून या लोककलेचे जतन केले असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. प्रा. चं. वी. जोशी यांनीही त्यांच्या कार्याचा उल्लेख करत लोककला जपण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी व राजकुमार पाटील यांनी केले.
---
स्पर्धेतील पारितोषिक विजेते
- द्वितीय क्रमांक : रुक्मिणी, अर्चना, जोत्स्ना वाईकर - पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे (ता. वाई, जि. सातारा) व प्रिया नगरकर - न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, यवत-चौफुला (जि. पुणे) (प्रत्येकी रोख दोन लाख व सन्मानचिन्ह).
- तृतीय क्रमांक : वैशाली समसापूरकर - जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी (जि. पुणे) (रोख एक लाख व सन्मानचिन्ह).
- चतुर्थ क्रमांक : अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा (जि. अहिल्यानगर)
- पाचवा क्रमांक (विभागून) : वैष्णवी कोल्हापूरकर - रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप- वाठार (जि. कोल्हापूर), अपर्णा कीर्ती नगरकर - लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी (जि. पुणे).
---
वैयक्तिक पारितोषिके
- उत्कृष्ट मुजरा - नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, मोडनिंब (रोख ३ हजार)
- उत्कृष्ट गायिका - राखी चौरे
- उत्कृष्ट ढोलकीवादक - राहुल जावळेकर
- उत्कृष्ट हार्मोनिअम वादक - अनिकेत साळुंखे (अंबप-वाठार) (प्रत्येकी रोख १ हजार व सन्मानचिन्ह)
---
चौकट
जयसिंह मोहिते-पाटलांना ‘पद्मश्री’साठी प्रयत्न करणार : आमदार दिलीप
स्पर्धेदरम्यान अनेक ज्येष्ठ कलाकारांनी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या लावणी क्षेत्रातील योगदानाबद्दल शासनाने त्यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा, अशी मागणी केली. तसेच कलाकारांना शासनाकडून मानधन मिळावे, अशी मागणीही करण्यात आली. या दोन्ही मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार दिलीप सोपल यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ट्विटरवर 'पॉर्नबंदी'? अडल्ट कंटेंट ब्लॉक केल्याचा दावा, युजर्सचा संताप

पुण्यात होळीच्या कार्यक्रमावेळी दुर्घटना, लाइटचा गर्डर कोसळून १५ तरुण-तरुणी जखमी; चौघांवर ससूनमध्ये उपचार सुरू

Kolhapur Accident News : कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात, दूध वाहतूक टेम्पोचा ब्रेक फेल; तीन दुचाकीला उडविले

Atharva Birari : नवलच! वयाच्या २२ व्या वर्षी नाशिकचा अथर्व बिरारी झाला 'सीए'; पहिल्याच प्रयत्नात देशात ४० वा!

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

SCROLL FOR NEXT