पुणे

विधानपरिषदेच्या १० सदस्यांनी घेतली शपथ

CD

विधान परिषदेच्या
दहा सदस्यांनी घेतली शपथ
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : नीलम गोऱ्हे, बच्चू कडू यांच्यासह दहा सदस्यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणून गुरुवारी (ता. १४) शपथ घेतली. सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व सदस्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली.
या वेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास दानवे, डॉ. प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झिशान सिद्धिकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे या सदस्यांनी शपथ घेतली.
विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. या वेळी सभापती प्रा. शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

बच्चू कडूंनी सूचना डावलली
नवनिर्वाचित सदस्यांनी शपथेव्यतिरिक्त कोणतीही घोषणा अथवा वाक्य बोलू नये, अशी सूचना केली होती. मात्र बच्चू कडू यांनी प्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख केला. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT