पुणे

राजगुरूनगरच्या मसाप शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर

CD

राजगुरुनगर, ता. ५ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजगुरुनगर शाखेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारे वाङमयीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कारांसाठी अनुक्रमे ‘लाकडाचे कान’ (प्रा. डॉ. केशव देशमुख, पुणे), ‘निर्जनांचे प्रदेश’ (संतोष दौंडे, अहिल्यानगर), ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ (प्रतिभा खैरनार, नांदगाव, जि. नाशिक), ‘ऋतुसमिधांच्या आर्द्रा’ (संतोष घसिंग, बीड), ‘शापित कोलाहलाच्या नोंदी’ (अरविंदा भामरे, धुळे) या कवितासंग्रहांची निवड झाली आहे. पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे.
सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठी देण्यात येणाऱ्या कै. शंकर पाटील स्मृती कथासंग्रह पुरस्कारासाठी ‘खरा वारस’ (हरिश्‍चंद्र पाटील, टेंभुर्णी, जि. सोलापूर) या कथासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती कादंबरी पुरस्कार, ‘रानोबाचा माळ’ (ऋषिकेश गोल्हार, छत्रपती संभाजीनगर) या पुस्तकास जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ललित लेखनाचा प्रा. चंद्रकुमार नलगे ललित लेखन पुरस्कार ‘एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ (संगीता अरबुने, मुंबई) या पुस्तकास देण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट चरित्र लेखनाचा डॉ. आनंद यादव स्मृती पुरस्कार, ‘साहेबांच्या सहवासात’ (विजय घोलपे, कोल्हापूर) या पुस्तकास जाहीर झाला आहे.
हे पुरस्कार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजगुरुनगर येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे, उपाध्यक्ष सदाशिव आमराळे व कार्यवाह शरद बुट्टे-पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्ता (DA) तब्बल 58% वर; महाराष्ट्राबाबत काय निर्णय?

चेहऱ्यावरचे बारीक केस काढायचे आहेत? फक्त ‘ही’ घरगुती ट्रिक करा अन् पाहा फरक

T20 WC, IND vs ENG: भारत - इंग्लंड सामन्यादरम्यान पावसाचा अडथळा येणार? कसे असेल वातावरण आणि फ्रीमध्ये कसा पाहाणार सामना?

तोतया पोलिसांना बसणार लगाम! अधिकारी, अंमलदारांना एनएफसी-क्यूआरयुक्त नवी ओळखपत्रे मिळणार

Latest Marathi News Live Update : धुळ्यातील साक्री येथील हनुमंतपाडा येथे पुतणी सोबत बोलण्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT