पुणे

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

CD

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या
निवडणुकांचा मार्ग मोकळा

५० टक्क्यांच्या मर्यादेत निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्यातील प्रलंबित २० जिल्हा परिषदा आणि सुमारे २२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांना हिरवा कंदील दाखवला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाहीत, अशी स्पष्ट भूमिका घेत न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.

तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी
ओबीसी आरक्षणावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. राज्यातील २० जिल्हा परिषदा आणि २२५ पंचायत समित्यांमध्ये ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी आणि आरक्षणाची एकूण मर्यादा यावरून हा पेच निर्माण झाला होता.
यापूर्वी मे २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या व्यवस्थेनुसार निवडणुका घेण्यास मान्यता दिली होती. मात्र, काही भागांत आरक्षणाची एकूण टक्केवारी ५० टक्क्यांच्या पुढे जात असल्याचा मुद्दा समोर आल्याने ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा न्यायालयात अडकली होती.

घटनात्मक मर्यादेचे काटेकोर पालन बंधनकारक
सुनावणीदरम्यान खंडपीठाने आरक्षणाच्या मर्यादेबाबत भूमिका स्पष्ट केली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग यांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांची घटनात्मक मर्यादा न ओलांडता या निवडणुका घेणे बंधनकारक असेल, असेही न्यायालयाने निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Books: सरकार बदललं अन् शालेय पाठ्यपुस्तकातील 'हे' शब्दही बदलले; पश्चिम बंगालमध्ये मुघल इतिहासाला कात्री

Meenakshi Shinde Resign: माझ्या मनाला प्रचंड वेदना होतायत..., मीनाक्षी शिंदेंनी राजीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहलंय?

WPL AUCTION 2027: वय फक्त १५ वर्षे, WPL ऑक्शनमध्ये इतिहास! दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला निवडलं, कोण आहे ही युवा अष्टपैलू खेळाडू?

Latest Marathi News Update: आदिवासी महिलेचे चोरी झालेले मंगळसूत्र मिळाले

Israel Politics: बहुमत हुकलं तरी नेतान्याहू 'प्रचंड आशावादी'! थेट विरोधकांशीच आघाडीची तयारी

SCROLL FOR NEXT