tha 
पुणे

पुणे : चाैथ्या लॉकडाउनची नियमावली जाहीर; पुण्यात काय राहणार बंद?

सकाळवृत्तसेवा

पुणे : लॉकडाऊन 4 साठी राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार पुणे शहरातील कॅन्टेमेन्ट झोन (रेड झोन) मध्ये औषध दुकाने आणि जीवनावश्‍यक वस्तू दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या या भागात जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती. नव्या नियमावलीमुळे काही प्रमाणात तेथील नागरीकांना दिलासा मिळणार आहे. 

राज्यासह देशभरात चौथा लॉकडाऊन सुरु झाला असून, या लॉकडाऊनची नियमावली आता राज्य सरकारने जाहीर केली आहे. कोणत्या झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद असेल, हे यामध्ये सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने चौथ्या लॉकडाऊनची नियमावली ठरवण्याचे अधिकार राज्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने ही नियमावली जारी केली आहे. हि नियमावली 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहणार आहे. 

यापूर्वी पुणे शहरात तिसऱ्या लॉकडाऊनच्या काळातील शेवटच्या आठवड्यात रेड झोनच्या परिसरात दूध आणि जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने देखील बंद ठेवण्यात आली होती. आता मात्र चौथ्या लॉकडाऊनच्या काळात या झोन मध्ये ती सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चौथ्या लॉकडाऊनच्या काळात सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद राहणार आहे. केवळ देशांतर्गत अत्यावश्‍यक सेवेसाठी हवाई वाहतूक सुरु राहणार आहे. याशिवाय शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, शिकवणी वर्ग हे देखील बंद राहतील. केवळ ऑनलाईन वर्ग सुरु राहतील. 

पुण्यात काय बंद राहणार.. 
-डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार 
-शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्‍लास बंद, ऑनलाईन -शिक्षणासाठी प्रोत्साहन हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार. 
-सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थिएटर, बार बंद राहणार 
-सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी 
-सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार 
-रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्‍यक सेवा त्यातून वगळल्या 
- 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्‍यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आतापर्यतचा लॉकडाऊन कालावधी- 

पहिला लॉकडाऊन 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस) 
दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस) 
तिसरा लॉकडाऊन 4 मे ते 17 मे (14 दिवस) 
चौथा लॉकडाऊन 18 मे ते 31 मे (14 दिवस) 

पुण्यातील रेडझोन मध्ये काय सुरू राहणार 
-जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने 
-मेडीकल, आरोग्य सोयी-सुविधा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT