पुणे

एक लाख अमराठी शिकले मराठी

CD

एक लाख अमराठी शिकले
मराठी ः परिवहन मंत्री सरनाईक

मराठी शिकवणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : ‘‘महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठी भाषेशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यावहारिक मराठीचे धडे यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे,’’ असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
मंत्री सरनाईक म्हणाले, ‘‘मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. येथे उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा, हा आमचा प्रामाणिक आग्रह आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर झाला, तर केवळ व्यवहार सुलभ होणार नाही, तर माणसा माणसांमधील आपुलकीचे बंधही अधिक दृढ होतील. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक आणि सन्मानपूर्वक प्रतिसाद दिला आहे. मराठी शिकण्याचा त्यांचा हा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठीप्रेमाला वाहिलेली खरी आदरांजली आहे. राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राज्यभर लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे.’’
मराठी शिकण्याची ही संधी स्वीकारणारा प्रत्येक चालक हा केवळ नियमांचे पालन करणारा नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा संवेदनशील नागरिक ठरत असल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.

चौकट ----
अभियानाचा १७ ऑगस्ट रोजी समारोप
एक मेपासून सुरू झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात हजारो अमराठी चालकांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने व्यावहारिक मराठी प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

SCROLL FOR NEXT