पुणे

agnWeather-forecast-June- 24_txt.txt

CD

राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज
---
मॉन्सूनच्या सरी कोसळणार; उर्वरित राज्यात वादळी पावसाची शक्यता
---
पुणे : मॉन्सूनने राज्य व्यापले असल्याने राज्यात जोरदार पावसाची आशा आहे. आज (ता. २५) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. तर कोकणात जोरदार सरींची, तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशच्या बांदा येथे देशातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हंगामी कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून पश्चिम बंगालपर्यंत सक्रिय आहे. उत्तर बंगालच्या उपसागर आणि बांगलादेशात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून उत्तर महाराष्ट्र ते पूर्व-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. राजस्थानपासून ते उत्तर महाराष्ट्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
बुधवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सूनच्या ढगांची छाया, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. राज्याच्या कमाल तापमानाचा पारा चाळिशीखाली आला आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.
आज (ता. २५ ) पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बीड, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने, उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
---
बुधवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)
‎---
‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
‎पुणे---३०.७---२१.६
अहिल्यानगर---३३.८---२२.८
धुळे---३७.०---२१
जळगाव---३५.२---२३.६
जेऊर---३४.०---१९.०
‎‎कोल्हापूर---२६.४--२१.२
‎महाबळेश्वर---१९.४---१६.४
मालेगाव---२९.२---निरंक
‎‎नाशिक---३१.७---२३.०
निफाड---३२.६---२३.०
‎सांगली---२७.९---२१.४
सातारा---२६.६---२१.६
‎सोलापूर---३४.४---२४.४
‎सांताक्रूझ---२९.४---२२.४
डहाणू---३१.१---२२.३
रत्नागिरी---२८.४---२४.४
छत्रपती संभाजीनगर---३५.६---२३.०
परभणी---३६.७---२४.९
परभणी (कृषी)---३७.४---२३.२
अकोला---३८.९---२४.३
अमरावती---३८.०---२०.९
भंडारा---३६.०---२१.०
बुलडाणा---३४.५---२२.६
ब्रह्मपूरी---३५.०---२२.६
चंद्रपूर---३३.८---२३.२
‎गडचिरोली---३१.६---२३.६
‎गोंदिया---३६.२---२२.२
‎नागपूर---३५.४---२१.८
‎वर्धा---३८.०---२२.७
‎वाशीम---३६.४---२२.२
‎यवतमाळ---३७.४---निरंक

--चौकट--
‎सरासरी तापमान (अंश से.)
‎विभाग---किमान---कमाल
‎उत्तर महाराष्ट्र---२१---३७.०
‎पश्‍चिम महाराष्ट्र---१६.४---३४.४
मराठवाडा---२२.०---३७.४
‎विदर्भ---२०.९---३८.९
‎कोकण---२२.३---३१.१
---
फोटो आहे. (agnDistrict rain forecast)
गुरुवारी (ता. २५) राज्यातील उष्ण व दमट हवामान, वादळी पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

जोरदार पावसाची शक्यता. (ऑरेंज अलर्ट)
पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ, चंद्रपूर.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, बीड, नांदेड.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मुंबई, ठाणे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT