maharashtra mumbai pune bengali workers information marathi 
पुणे

बंगाली मजूर आणि पुण्या-मुंबईचं नातं तुम्हाला माहितीय?

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे नाते खूप जुने आहेच; पण तुम्हाला माहितीय का राज्यातील सर्वाधिक बंगाली कामगार-मजुरही महाराष्ट्राशीच जोडले गेले आहेत. कोरोना विषाणूनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत महाराष्ट्रातून आणि विशेषतः पुणे-मुंबईतून कामगार-मजुरांचे सर्वाधिक स्थलांतर झाले. ते आपापल्या गावी परतले. यामध्ये पश्चिम बंगालमध्ये देशभरातून दाखल झालेल्या बंगाली कामगार-मजुरांमध्ये सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील पुणे-मुंबई-ठाणे या पट्ट्यात काम करणाऱ्यांची आहे. लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेल्या पश्चिम बंगालमधील भौगोलिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे तेथील मजूर, कामगार वर्ग देशभर पोचला असून त्या-त्या शहरांतील अर्थव्यवस्थेला गती देण्याची भूमिका पार पाडत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाउन शिथील झाल्यानंतर किती मजूर परतले?
आतापर्यंत पुणे, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांसह राज्यातून तब्बल 72 हजार मजूर पश्चिम बंगालला परतले आहेत.

पश्चिम बंगालसाठी किती श्रमिल स्पेशल ट्रेन धावल्या?
पश्चिम बंगालसाठी तब्बल 42 श्रमिक स्पेशल ट्रेन गेल्या दहा दिवसांत धावल्या आहेत. त्यामध्ये पुण्यातून पाच, ठाण्यातून सात आणि मुंबईतून निघालेल्या 25 रेल्वेगाड्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक बंगाली कामगार आहेत?
महाराष्ट्रात एकूण नऊ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बंगाली कामगार आहेत. त्यापैकी सर्वाधिक कामगार पुणे, मुंबई, ठाणे या तिन जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यानंतर जळगाव आणि नगर जिल्ह्यांचा समावेश होतो. कोल्हापूर, नांदेड, नागपूर आणि रत्नागिरीमध्येही बंगाली कामगार काम करतात.

देशात बंगाली कामगार-मजूर कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक आहेत?
देशात महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक बंगाली कामगार-मजूर आहेत.

बंगाली कामगार-मजूर कोणत्या क्षेत्रात काम करतात?
 महाराष्ट्रापुरता विचार केला, तर महाराष्ट्रात सोन्याचे दागिने घडविण्याच्या क्षेत्रात सर्वाधिक बंगाली कारागीर काम करतात. याशिवाय मिल कामगार, प्लंबिंग, बांधकाम, गवंडीकाम आदी क्षेत्रामध्येही बंगाली कामगार मोठ्या संख्येने आहेत.

कामगार-मजुरांना प्रवासात आणि पश्चिम बंगालमध्ये काय मदत केली जात आहे?
महाराष्ट्रातून रवाना होणाऱ्या मजुरांना तीन लिटर पाण्याची बाटली आणि खाद्यपदार्थ दिले जात आहेत. पश्चिम बंगालमध्ये उतरल्यावर तेथील सरकार त्यांची गावापर्यत पोचेपर्यंत पुरेशी काळजी घेते आहे. महाराष्ट्रातून परणाऱया प्रत्येक मजूर, कारागीराचा स्वॅब घेऊन त्याची तपासणी करण्याची व्यवस्थाही पश्चिम बंगाल सरकारने प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणी केली आहे.

बंगाली मजुरांना का स्थलांतर करावे लागते?
साठ वर्षांपूर्वी, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी पश्चिम बंगालचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त होते. ब्रिटीश काळापासून कोलकता आणि मुंबई ही महत्वाची आर्थिक केंद्रे होती. राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राने प्रगती केली. मात्र, पश्चिम बंगाल मागे पडत गेला. अवघ्या सव्वा तीन दशकांत महाराष्ट्रापेक्षा पश्चिम बंगालचे दरडोई उत्पन्न सुमारे 69 टक्क्यांनी घसरले. परिणामी, बंगाली नागरीकांना रोजगारासाठी स्थलांतर करणे भाग पडले.

महाराष्ट्रातून पतरणाऱ्या मजुरांना रेल्वेतून ज्या त्या जिल्ह्याच्या ठिकाणी उतरविले जाते आणि तेथे त्यांची तपासणी होते आहे. पश्चिम बंगाल सरकार त्यांची पुरेशी काळजी घेते आहे.
संजय थाडे, प्रिन्सिपल सेक्रेटरी, पश्चिम बंगाल सरकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sri Lanka Test Tour: बुमराह बाहेर, २८ वर्षीय खेळाडूची अचानक एन्ट्री! श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठा बदल; कोण आहे हा गोलंदाज?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी- अमित शहा हरवल्याची जाहिरात देणार; असं का म्हणाले संजय राऊत?

Viral Video : हृदयद्रावक घटना ! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपल्याने रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या 'दादा स्टाइल'नं जिंकलं मन, बारामतीला दिलं मोठं गिफ्ट, अन् कंठ दाटला..

NH48 Wall Collapse : पुणे-बंगळूर महामार्गाच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी! दिल्लीच्या केंद्रीय पथकाकडून निपाणीत अत्याधुनिक यंत्रांनी तपासणी, मोठे अधिकारी अडचणीत?

SCROLL FOR NEXT