पुणे

विद्यापीठ स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम हवा; 'मनविसे'ने केली मागणी!

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या महासंकटात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ यांच्यावर कामाचा ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्याची गरज आहे. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठ पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करावा, याचा फायदा अशा संकट समयी होऊ शकतो," अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.

विद्यापीठ पातळीवर आपत्ती व्यवस्थापनाचा पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केल्यास अशा संकट समयी त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये वारंवार नवीन बद्दल होत असल्याने विद्यार्थी देखील अशा नव्या शिक्षणासाठी उत्सुकतेने प्रवेश घेतील. अशा नवीन पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणामुळे रोजगार निर्मितीसाठी देखील फायदा होईल. तसेच राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर देखील आपत्ती व्यवस्थापनासाठीच्या कुशल मनुष्यबळाची सध्या मोठी मागणी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे, असे यादव यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठ पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष असावा. त्यात उपयुक्त साधन सामग्री हवी. तसेच संबंधित कक्षांची उपकेंद्रे जिल्हास्तरावर करताना विद्यापीठाची उपकेंद्रे असणाऱ्या नगर आणि नाशिक जिल्ह्यात संबंधित कक्षाची स्थापना करावी. या कक्षांना थेट जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफशी संलग्न केल्यास प्रत्येक संकट समयी सर्व तंत्रज्ञान तसेच प्रशिक्षण असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. यातून विद्यार्थ्यांचा देखील नवीन करिअर संधी आणि देशसेवेची संधी मिळेल, असे यादव यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT