MNVS_Sourabh_Rao 
पुणे

'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांसाठी...'; मनविसेने विभागीय आयुक्तांकडे काय केली मागणी?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे पुणे सोडून गेलेले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुण्यात येणार आहेत. बहुतांश जण त्यांच्या खोल्या सोडून गावाकडे गेले होते, त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था शासनाने करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. 

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी खबरदारीच्या उपाययोजना आयोगाकडून घेण्यात येत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात या विद्यार्थ्यांना आपली राहती खोली, वसतिगृह सोडावे लागले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी शहरात आल्यानंतर निवास व्यवस्थेची मोठी अडचण येणार आहे.

राज्यभरात सध्या असंख्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाकीची आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती देखील हलाकीची आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात यावी, अशी मागणी शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे. राव यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन निवास व्यवस्था करण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT