पुणे

नववर्षात राज्यात आठ हजार पोलिसांची भरती

CD

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १४ : राज्यातील जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस अंमलदारांची माहिती गृह मंत्रालयाने मागविली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ११७ तर राज्यभरातील सुमारे आठ हजार १०० पदे आहेत. नववर्षात पोलिस भरतीस प्रारंभ होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रमी पोलिस भरती झाल्या आहेत. मागील दोन वर्षांपासून दरवर्षी पोलिस भरती होत आहे. गतवर्षी १५ हजार ६३१ पदांची पोलिस भरती झाली. राज्यातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा भरतीचे नियोजन केले आहे. त्यानुसार जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या अंदाजे आठ हजार पदांची भरती नववर्षात होणार आहे. सध्या मागच्यावेळी भरती झालेल्यांचे जूनपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये या नवप्रविष्ठ पोलिसांचे प्रशिक्षण संपणार आहे. या पार्श्वभूमीवर जानेवारीपासून नवीन पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे, जेणेकेरून सध्या प्रशिक्षण घेणाऱ्यांचे प्रशिक्षण संपताच नवीन भरती झालेल्यांना तेथे प्रशिक्षणासाठी जाता येईल, असे नियोजन गृह मंत्रालयाकडून सुरू आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस बल, चालक पोलिस शिपाई, बॅण्ड्‌समन यांचीही पदे या भरतीतून भरली जातील, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
----------------
चौकट
भरतीपूर्वी वेळापत्रकाची शक्यता
आमदार बच्चू कडू यांच्या मागणीनुसार गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ९ सप्टेंबरला सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, अतिरिक्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव व अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी तरुणांना पोलिस भरतीची तयारी करता यावी, यासाठी भरतीपूर्वीच पोलिस भरतीचे वेळापत्रक जाहीर करता येईल का, यादृष्टीने चर्चा झाली. पोलिस भरतीपूर्वी काही महिने आधी आता भरतीचे वेळापत्रक जाहीर होऊ शकते, असेही बैठकीला उपस्थित वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
----------------
भरतीचे संभाव्य नियोजन
एकूण रिक्त पदे
८,१००
भरतीसाठी अर्जाची मुदत
१ ते ३१ डिसेंबर २०२६
भरतीला सुरवात
१ जानेवारी ते ३१ मार्च २०२७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT