पुणे

राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज : पाटील

CD

पुणे, ता. ९ : ‘‘राज्याची कायदा-सुव्यवस्था बिघडली असून, सत्य बोलणे अवघड झाले आहे. मीसुद्धा गृहखाते पाहिले आहे. महाराष्ट्र हे मोठे राज्य असल्याने प्रशासकीय सुलभतेसाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा, अशी काँग्रेसची मागणी आहे,’’ असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी येथे केले.
पुण्यात आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी गृहखात्याच्या कारभारावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहावी, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल; तर त्यांनी गृहमंत्रिपद सोडायला हवे.’’ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्‍यावर पाटील म्‍हणाले, ‘‘आज राज्यात सत्य बोलणे अवघड झाले आहे. शाईफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करावी.’’ आणखी एक दादा पुण्याच्या प्रेमात पडले आहेत का?... या प्रश्नावर, पुणेकर कोल्हापूरच्या लोकांचा स्वीकार करतात म्हणून मी आलो आहे, अशी मिश्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दमदाटी अन् गुंडागर्दी : ठाकूर
एका प्रवक्त्याने विचार मांडले म्हणून त्यांच्यावर शाई फेकणे ही निव्वळ गुंडागर्दी आहे, अशी टीका माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली. मुख्यमंत्री सत्तेच्या लालसेपोटी गृहमंत्रिपद सोडायला तयार नाहीत. सरकार शक्ती कायदा मंजूर न करता केवळ भावनांचे राजकारण करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Cabinet: मोदी सरकारमधील अनेक मंत्री देणार राजीनामे? देशाच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? मोठी माहिती समोर

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Latest Marathi News Live Update : कुर्ला-चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोंडी

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गावरून सांगलीत पुन्हा ठिणगी? वाळव्‍यात 1276 शेतकऱ्यांकडून हरकती, भूसंपादन प्रक्रियेविरोधात मांडली भूमिका

SCROLL FOR NEXT