पुणे

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय रद्द

CD

पुणे, ता. १३ : भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा दिलेला पर्याय (ऑप्टिंग आउट) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यायाचा गैरवापर झाल्यामुळे ऑप्टिंग आउट बंद करण्याची वेळ आली.
आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
आयोगाने भरती प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने ऑप्टिंग आउट ही संकल्पना लागू केली. या प्रक्रियेद्वारे तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांना भरती प्रक्रियेतून स्वेच्छेने बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येतो. आयोगाने बुधवारी या संदर्भात बैठक घेऊन चर्चा केली. तसेच आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षांसाठी भरती प्रकियेतून बाहेर पडणे हा पर्याय रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा आणि मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांसाठी भरती प्रकियेतून बाहेर पडणे, संमती विकल्प देणे हा पर्याय रद्द करण्यात येत आहे. हा निर्णय बुधवारपासूनच लागू केल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. एकल संवर्गाच्या भरती प्रक्रियेसाठी प्रतीक्षा यादी कार्यान्वित राहील. बहुसंवर्गीय पदांच्या भरती प्रकियेसाठी प्रतिक्षा यादी राहणार नाही. बहुसंवर्गीय पदभरतीत उमेदवार ज्या पदावर अगोदरच नियुक्त झाला असेल, अशा पदाचा अथवा निम्न पदाच्या संबंधित उमेदवाराने पसंतीक्रम दिल्यास त्याचा त्या पदासाठी किंवा निम्न पदावरील शिफारसीसाठी विचार केला जाणार नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

MSRTC Officials: एसटीचा तोटा भरून काढा, नाहीतर नोकरी गमवा! प्रताप सरनाईकांचा कामचुकार अधिकाऱ्यांना अल्टिमेटम; ३० दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT