पुणे

महाराष्ट्र सुरक्षा कायद्याला आव्हान

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या याचिकांवर सुनावणी घेण्यापासून मुंबई उच्च न्यायालयातील न्या. गौतम अंखड यांनी आज स्वतःला अलिप्त ठेवले. त्यामुळे या याचिकांवरील पुढील सुनावणीचा मार्ग नव्या खंडपीठाच्या नियुक्तीनंतरच स्पष्ट होणार आहे.
प्रभारी मुख्य न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या याचिका प्राथमिक सुनावणीसाठी आल्या होत्या; मात्र न्या. अंखड यांनी सुनावणीपासून स्वतःला दूर ठेवले. दरम्यान, राज्य सरकारने याचिका निरर्थक असल्याचा दावा करून त्या फेटाळण्याची मागणी केली. या कायद्यामुळे सरकारला संघटनांवर बंदी घालणे, त्यांची मालमत्ता जप्त करणे आणि ताब्यात घेणे यासारखे व्यापक अधिकार मिळतात. हे अधिकार मनमानी असून, संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे.


मकाेकापेक्षाही कठोर असल्याचा दावा
महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा हा बेकायदा कृत्ये (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यासारख्या(मकाेका)पेक्षाही कठोर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. विरोधी पक्ष, नागरी समाज आणि कायदेशीर मार्गाने असहमती व्यक्त करणाऱ्यांविरुद्ध त्याचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डीएसपी ब्लॅक, स्मिरनॉफसह अनेक ब्रँडना फटका! FSSAIच्या तपासणीत मोठा खुलासा; १८ हजार पेट्या जप्त, कारण काय?

Bhimashankar Temple : श्रावणापासून भीमाशंकर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९.३० पर्यंत दर्शनासाठी खुले

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

SCROLL FOR NEXT