Tamhini Ghat rainfall Record Esakal
पुणे

Tamhini Rainfall: देशात भारी... ताम्हिणी घाटात यंदा भारतातील सर्वाधिक पाऊस

Tamhini Ghat Rainfall Record: हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ताम्हिणी घाटाची अद्वितीय भौगोलिक परिस्थिती आणि पश्चिम घाटातील स्थानामुळे इथे अधिक पाऊस होण्यास मदत होते.

आशुतोष मसगौंडे

यंदाच्या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात 9,644 मिमी पाऊस झाला, जो देशात यंदाच्या पावसाळ्यात पडलेला सर्वाधिक पाऊस आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, यंदा ताम्हिणी घाटात सर्वाधिक 9,644 मिमी तर दुसऱ्या स्थानी असलेल्या मेघालयातील चेरापुंजी येथे एकूण 7,303.7 मिमी इतका पाऊस पडला आहे.

दरम्यान, दावडी, भीमाशंकर, शिरगाव, लवासा आणि लोणावळा या महाराष्ट्रातील इतर भागात या पावसाळ्यात 5,000 ते 7,000 मिमी दरम्यान पाऊस झाला आहे.

शिवाय, साताऱ्यातील महाबळेश्वर, वाळवण, कोयना; नाशिकमधील घाटघर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर; तसेच कोल्हापुरातील गगनबावडा आणि आंबोलीतही यंदा पावसाने जोरदार बॅटींग केली आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ताम्हिणी घाटाची अद्वितीय भौगोलिक परिस्थिती आणि पश्चिम घाटातील स्थानामुळे इथे अधिक पाऊस होण्यास मदत होते. अरबी समुद्राच्या सान्निध्यात असलेला प्रदेश आणि त्याची उंची यामुळे इथे पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो.

आयएमडी पुणेचे हवामानशास्त्रज्ञ एसडी सानप यांनी ताम्हीणीत यंदा इतका पाऊस का पडला याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, सह्याद्री पर्वतरांगेने, ताम्हिणीवर मोठ्या प्रमाणात ढग निर्माण करून, तीव्र पर्जन्यवृष्टीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याशिवाय, अरबी समुद्रातून येणारा मान्सूनचा जोरदार प्रवाह आणि गुजरात आणि महाराष्ट्रात तयार होणाऱ्या हवामान प्रणालींमुळे ताम्हिणीतील मुसळधार पावसाला हातभार लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iranian Oil Tanker: होर्मुझ ओलांडल्यानंतर समुद्रात मोठा खेळ; भारताकडे निघालेल्या इराणी जहाजाचा यू-टर्न, चीनला जात आहे तेल

IAS transfer news : कोल्हापूर जिल्हाधिकारी, झेडपी सीईओ, महापालिका आयुक्तांची बदली; एकाच दिवशी धडाधड बदल्यांच्या आदेशाने चर्चांना उधाण

Konkan Mango Farmers : कोकणच्या हापूस उत्पादकांसाठी मोठी बातमी! राजू शेट्टींच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांनी घेतला 'हा' निर्णय, वाशी APMC मधील बैठकीत काय ठरलं?

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेतील हजार कोटींच्या टेंडर्सवर मोठा निर्णय

Gas Cylinder Line : भर उन्हात नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा; तुटवड्यामुळे ग्राहकांचे हाल, तब्बल ४६०० ग्राहकांची नोंदणी

SCROLL FOR NEXT