MLS26B02617
माळशिरस : लाभार्थींना दाखले वाटप करताना प्रांताधिकारी पांगारकर, लाभार्थी व अधिकारी.
---
खुडूस येथे २५५ लाभार्थींनी
घेतला विविध योजनांचा लाभ
महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
माळशिरस, ता. ७ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत महसूल अभियानाद्वारे महालिंगेश्वर विद्यालय, खुडूस येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये एकूण २५५ लाभार्थींनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतल्याची माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.
कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, प्रभारी तहसीलदार अमोल कदम, महसूल नायब तहसीलदार सिद्धनाथ जावीर, धानोरेचे सरपंच जीवन जानकर, पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र ठवरे, श्रीराम शिक्षण संस्था, पानीवचे सचिव करण पाटील, खुडूस मंडलाधिकारी सिद्धेश्वर भोसले, तलाठी सचिन पाटील यांच्यासह मंडलातील सर्व तलाठी, कोतवाल व महा ई-सेवा केंद्रचालक उपस्थित होते.
शिबिरात जातीचे ४९ दाखले, डोमासाईल प्रमाणपत्र १७, उत्पन्न दाखले १२, सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे २८ लाभार्थी, तुकडे जोड- तुकडेबंदी कायद्यान्वये १९ लाभार्थी, कजाप योजनेंतर्गत ६० लाभार्थी, रेशन कार्डसाठी ११ लाभार्थी, कृषी विभागामार्फत दोन ट्रॅक्टरचे वाटप, भूमी अभिलेख विभागाचे ५ लाभार्थी, वारस नोंदी व जिवंत सातबारा १६ प्रकरणे तसेच आरोग्य विभागामार्फत ३६ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.