पुणे

निंबूतमध्ये प्रलंबित नोंदींवरून गोंधळ

CD

सोमेश्वरनगर, ता. १६ : निंबूत (ता. बारामती) येथे आयोजित ''महाराजस्व'' समाधान शिबिरात १७७ नागरिकांना विविध दाखल्यांचा लाभ मिळाला. मात्र, शेतजमीन नोंदींच्या प्रलंबित कामांवरून संतप्त शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाला धारेवर धरल्याने शिबिरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
करंजेपूल मंडल क्षेत्रासाठी आयोजित या शिबिराचे उद्घाटन सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे व पंचायत समिती सदस्य दिग्विजय जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी नायब तहसीलदार स्वाती गायकवाड, सतीश काकडे, रमाकांत गायकवाड आदी उपस्थित होते. शिबिरात जन्म-मृत्यू, उत्पन्न, अधिवास, नॉन क्रिमीलेयर दाखले आणि सातबारा वाटप करण्यात आले. तसेच दोन ट्रॅक्टरचे वाटप व आधारकार्ड दुरुस्तीची कामेही पार पडली.
दरम्यान, योगेश सोळसकर या शेतकऱ्याने जमिनीच्या नोंदी रखडल्याबाबत प्रशासनाला जाब विचारला. "फेब्रुवारीपासूनच्या नोंदी का रखडल्या आहेत? पैशांशिवाय कामे होणार नाहीत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोरटेवाडी व खंडोबाचीवाडी येथील शेतकऱ्यांनीही प्रशासकीय दिरंगाईबाबत तक्रारी मांडल्या. मंडल अधिकारी प्रमिला लोखंडे यांनी संबंधित शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले असून १५ दिवसांत कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. सरपंच हेमंत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले, तर मदन काकडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT