पुणे

निकाल जाहीर

CD

टुडे एकसाठी अँकर

शिष्यवृत्तीत राज्यात अहिल्यानगर तिसरा
राज्याच्या गुणवत्तायादीत जिल्ह्यातील ४१ विद्यार्थी
अहिल्यानगर, ता. १२ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक (इयत्ता चौथी) व उच्च प्राथमिक (सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. सर्व व्यवस्थापनाचा चौथीचा निकाल ४३.९०, तर सातवी ३८.४५ टक्के निकाल लागला. झेडपीचा अनुक्रमे ४५.०२ व ३९.०६ टक्के निकाल आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत जिल्ह्यातील ४१ विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
जिल्हा परिषदेच्या शाळेत मिशन आरंभच्या माध्यमातून सराव परीक्षा घेण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी दिली.
शिष्यवृत्तीत जिल्हा गुणवत्ता यादीत जिल्हा परिषदेचे ४०१, खासगी प्राथमिकचे १८९, माध्यमिकचे ८, मनपाचा १, स्वयंअर्थसहाय्यीतचे ७८, असे ६७७, तर सातवीचे जिल्हा परिषदेचे १३७, खासगीचे ३३, माध्यमिकचे ३८५, स्वयंअर्थसाय्यीतचे १२३, आदिवासी समाजकल्याणचे ४, अशा ६८२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

राज्य गुणवत्ता यादी ः इयत्ता चौथी (ग्रामीण) - राजवीर मेमाणे (नववा, नवलेवाडी, अकोले), वेदश्री आवारी (नववी, नाटेवाडी, कोपरगाव), नचिकेत शिंदे (आठवा, राशीन, कर्जत), यशश्री आहेर (दहावी, कुंडवस्ती, पारनेर), ह्रदयांश शिंदे (सातवा, नवनाथनगर, श्रीगोंदे).
चौथी (शहरी)- चिन्मय म्हस्के (आठवा, हिंद सेवा मंडळ, नगर), सर्फराज शेख (अकरावा, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, नगर), सर्वेश नरवडे (अकरावा, इचरजबाई फिरोदिया, नगर).
उच्च प्राथमिक (ग्रामीण)- शंभू आठरे (दुसरा, निंबोडी, नगर), वैष्णवी मगर (तिसरी) व सई थोरात (तिसरी), विराज तेरकर (सातवा, तिघेही वाघुंडे, पारनेर), आदित्य अंत्रे (आठवा, विखे पाटील, लोणी), श्रुती हजारे (नववी, मिरजगाव, कर्जत), ऋग्वेदी ठाणेकर (दहावी, विखे पाटील, लोणी), पार्थ काळे (दहावा, जगदंबा, राशीन, कर्जत), श्रावण ढोरमले (दहावा, राळेगणसिद्धी, पारनेर), घनश्‍याम ढेपे (अकरावा, आत्मा मालिक कोकमठाण, कोपरगाव), समृद्धी पावरे (तेरावी, वाघुंडे खुर्द, पारनेर).
सातवी (शहरी) - मनस्वी रणसिंग (तेरावी, सोमय्या स्कूल, श्रीरामपूर), स्वरा शेळके (चौदावी, कन्या विद्यालय, श्रीगोंदे), सर्वेश सातपुते (चौदावा, पारनेर पब्लिक स्कूल), अनन्या ठाकरे (पंधरावी, सोमय्या स्कूल (श्रीरामपूर), ईशान ठुबे (सोळावा, पारनेर पब्लिक स्कूल).
-------
चौकट
श्रीरामपूरची पोरं हुश्‍शार
एप्रिल महिन्यात ही परीक्षा झाली होती. सोमवारी त्याचा अंतिम निकाल जाहीर झाला. चौथीच्या यादीत जिल्ह्याने तिसरा क्रमांक पटकावला. सातवीमध्ये पाचवा क्रमांक आला. श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा निकाल तब्बल ७०.८६ लागला. उच्च प्राथमिकमध्येही त्यांचे ६०.५१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IRE vs AFG: विराट कोहली-शिखर धवनलाही टाकलं मागे, अफगाणिस्तानच्या ओपनरची विक्रमी शतकासह पीटरसनच्या क्लबमध्ये एन्ट्री

नाशिक-रायगडमध्ये कोण करणार ध्वजारोहण? मंत्र्यांची यादी जाहीर; पाहा तुमच्या जिल्ह्यात कोण?

Organ Donate : दुःखातही अवयवदानाचा निर्णय! मुळेकर कुटुंबीयांच्या त्‍यागाने चौघांना जीवदान

जखमी हत्तींच्या मदतीला धावली 'एलिफंट ब्रिगेड'; पलामूमध्ये ४ पाळीव हत्तींचे अनोखे पथक

Tukaram Mundhe: आता कारवाई थांबणार नाही! तुकाराम मुंढेची ताकद अजून वाढणार; एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले...

SCROLL FOR NEXT