पुणे, ता. ८ : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या माध्यमातून राज्यात ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यात येत आहे. पुढील वर्षीच्या मार्च अखेर १०० टक्के कृषिपंपांना सौरऊर्जेद्वारे दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही पीएम कुसुम या केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर सुरू केली आहे. यामध्ये १६ हजार मेगावॉट क्षमतेचे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प विकेंद्रित स्वरूपात उभारण्यात येणार आहेत. आतापर्यंत सुमारे सात हजार मेगावॉटचे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातून उपलब्ध होणारी वीज आणि अन्य तांत्रिक उपायांच्या आधारे आता ८० टक्के कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा सुरू आहे. १०० टक्के कृषिपंपांना दिवसा सौरऊर्जेचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सौर कृषी पंप लावण्यात राज्याने आघाडी घेतली असून, देशातील एकूण सौर कृषी पंपांपैकी ६५ टक्के सौर कृषिपंप राज्यात बसवण्यात आले आहेत. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काचे साधन मिळत आहे. त्यांना हवे तेव्हा सिंचन करता येत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. सोबत शेतीची उत्पादकताही वाढत असल्याचा अनुभव येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.