पुणे

सहली, लग्नसोहळे, यात्रांचा प्रवास महागला

CD

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २२ ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रासंगिक करारावर दिल्या जाणाऱ्या बसच्या भाड्यात वाढ केली. यात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या साध्या बसच्या भाड्यात प्रति किलोमीटर ११ ते १९ रुपयांची भाडेवाढ झाली. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या सहली, लग्नसोहळे, यात्रा तसेच पर्यटनासाठी एसटी भाड्याने घेणाऱ्या सामान्य प्रवाशांना आणखी झळ बसेल.
जुलैमध्ये नियमित तिकीट दरात टप्पा पद्धतीनुसार पाच रुपयांच्या पटीत वाढ झाली. त्यानंतर प्रासंगिक कराराचे दरही पुनर्रचित करण्यात आले. साध्या बसच्या दुहेरी फेरीसाठी जुना दर ६४ वरुन थेट ७५ रुपये प्रति किलोमीटर झाला. एकेरी फेरीसाठी हा दर ९६ वरून ११५ रुपयांवर गेला. निमआराम बसच्या दुहेरी फेरीत प्रति किमी. तीन, तर शयनयान बसमध्ये १० रुपयांनी वाढ झाली. वातानुकूलित शिवशाही व शिवनेरीच्या दुहेरी फेरीच्या दरात बदल न करता ते अनुक्रमे ८५ व १२० रुपये प्रति किमी ठेवण्यात आले.

सहलींसाठी सवलत कायम
शैक्षणिक संस्थांना सहलींसाठी दिल्या जाणाऱ्या साध्या बसच्या ५० टक्के सवलतीत बदल झालेला नाही. मात्र जुन्या ३२ रुपये प्रति किमीच्या दरात ५.५० रुपयांनी वाढ झाली आहे. सहलीसाठी ३७.५० रुपये प्रति किमी दराने साधी बस मिळेल. उर्वरित पन्नास टक्के रकमेची प्रतिपूर्ती शासन महामंडळाला करेल.

ई-बसना प्रोत्साहन
महामंडळाने ९ मीटर आणि १२ मीटर शिवाई ई- बसच्या प्रति किमी दरात २ ते ९ रुपयांपर्यंत कपात करून पर्यावरणपूरक गाड्यांना प्रोत्साहन दिले आहे. महामंडळाने डिझेल गाड्यांचे भाडे वाढवून वाढत्या इंधन खर्चाची भरपाई केली आहे; परंतु ई-बस वापरणाऱ्या संस्था आणि प्रवाशांना सवलत देऊन विजेवरील गाड्यांच्या वापराला प्राधान्य देण्याचे धोरण आहे.
----------
दुहेरी फेरीसाठी दर
प्रकार (आसनक्षमता) ः जुना दर ः नवा दर ः बदल
साधी बस (४०-४५ आसनी) ः ६४ ः ७५ ः ११ रुपयांनी वाढ
राजमाता जिजाऊ (५६ आसनी) ः ०० ः ९० ः ००
निमआराम (४५ आसनी) ः ७७ ः ८० ः ३ रुपयांनी वाढ
शयनआसनी (४५ आसनी) ः ०० ः ८५ ः ००
शयनयान (३० आसनी) ः ७० ः ८० ः १० रुपयांनी वाढ
वातानुकूलित शिवशाही (४०/४५ आसनी) ः ८५ ः ८५ ः बदल नाही
वातानुकूलित ९ मीटर ई-बस (३५ आसनी) ः ८९ ः ८० ः ९ रुपयांनी कमी
वातानुकूलित १२ मीटर ई-बस (४०/४५ आसनी) ः १०२ ः १०० ः २ रुपयांनी कमी
---------
भाडेवाढ झाल्यामुळे प्रासंगिक कराराचे दरही पुनर्रचित करण्यात आले आहेत. शैक्षणिक संस्थांना सहलींसाठी दिली जाणारी ५० टक्के सवलत कायम ठेवण्यात आलेली आहे.
- अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cold Medicine: पालकांनो लक्ष द्या! ४ वर्षांखालील मुलांना सर्दी-खोकल्याची ‘ही’ औषधं देऊ नका; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

HARISHCHANDRA BIRAJDAR: २० किलो वजनाचा फरक तरीही आव्हान स्वीकारलं; १४ मिनिटांत सतपाल सिंगला चीतपट करणाऱ्या बिराजदार मामांची गाजलेली कुस्ती

Bank Holiday: पुढच्या आठवड्यात 4 दिवस बँका बंद! महाराष्ट्रात कधी सुट्टी? रक्षाबंधनला बँका सुरू? पाहा RBI ची अपडेट

Maratha Reservation : माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिष्ठाई निष्फळ; मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींचे कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनेजमेंट’; देवेंद्र फडणवीसांची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमावरून जोरदार टीका

SCROLL FOR NEXT