Maharashtra State Board Education ssc exam is over student celebration pune  ssc exam
पुणे

हुश्श....संपली एकदाची परीक्षा!

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील भूगोल शेवटचा पेपर सोमवारी दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी संपला आणि लाखो विद्यार्थ्यांनी हुश्श करत जल्लोष

- मीनाक्षी गुरव

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा सोमवारी संपली. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील भूगोल म्हणजे अर्थातच सामाजिक शास्त्र भाग दोनचा शेवटचा पेपर सोमवारी दुपारी बारा वाजून ४५ मिनिटांनी संपला आणि लाखो विद्यार्थ्यांनी हुश्श करत जल्लोष केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी दहावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला.

त्यानंतर यंदाची बोर्डाची परीक्षा ऑनलाइन घ्यावी की ऑफलाइन अशी चर्चा सर्वत्र सुरू असताना परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी मात्र अभ्यासात सातत्य राखत परीक्षेची तयारी करत होते. अखेर परीक्षा प्रचलित पद्धतीने ऑफलाइन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्य मंडळातर्फे १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर २१ हजार ३७४ केंद्रांवर परीक्षा झाली. पुणे विभागातून जवळपास दोन लाख ७७ हजार ८१५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे दोन पेपर अजून शिल्लक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT