Maharashtra State Co-op Bank announces 10 per cent dividend annual meeting pune  sakal
पुणे

राज्य बँकेच्या वार्षिक सभेत १० टक्के लाभांश जाहीर

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील मुख्य कार्यालयात ३० जून रोजी प्रत्यक्ष पार पडली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात मिळविलेल्या ६०३ कोटी रुपये इतक्या भरीव नफ्याच्या पार्श्वभूमीवर वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना दहा टक्के लाभांशास एकमताने मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची १११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबई येथील मुख्य कार्यालयात ३० जून रोजी प्रत्यक्ष पार पडली. प्रारंभी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आर्थिक वर्षात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यांनी वार्षिक अहवालामध्ये नमूद केलेल्या सर्व बाबींचा ऊहापोह केला. सभेचे वैशिष्ट्य म्हणजे कायद्यातील तरतुदींचा आधार घेत कोणत्याही सभासदाला, कोणताही प्रश्न विचारण्यापासून प्रतिबंधित केले गेले नाही. तसेच, विषय पत्रिकेवरील प्रत्येक विषयांवर सभासदांनी विचारलेल्या सर्व शंकाचे निरसन केल्यानंतरच एकमताने सर्व विषय मंजूर करण्यात आले.

सभेत अडचणीतील साखर कारखाने व सहकारी संस्थांसाठी सामोपचार कर्ज परतफेड योजनेस एकमताने मंजुरी देण्यात आली. अडचणीतील साखर कारखाने व इतर सहकारी संस्थांना कर्ज अनुत्पादक कर्जाच्या वर्गवारीत गेल्यापासून द.सा.द.शे. सहा टक्के दराने सरळ व्याज पद्धतीने तडजोड रक्कम पुढील चार वर्षांत भरण्याची मुभा देण्यात आली. यासाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ७ टक्के व चौथ्या वर्षाकरिता ८ टक्के व्याजदराने व्याजाची आकारणी करण्यात येईल. तसेच, नियमित परतफेड करणाऱ्या संस्थेला एक टक्का व्याजामध्ये सूट देण्यात येणार आहे, असे अनास्कर यांनी सांगितले.

सलग आठव्यांदा ऑडिट वर्ग ‘अ’

राज्य सहकारी बॅंकेत अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ‘शून्य’ टक्के आहे. तसेच, बँकेला सलग आठ वेळा ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त झाला आहे. त्यामुळे सभासदांनी बँकेच्या प्रशासनाचा अभिनंदन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला.

२०२१-२२ आर्थिक वर्षातील बँकेची स्थिती

  • एकूण उलाढाल ४७ हजार २७ कोटी रुपये

  • ढोबळ नफा १४०२ कोटी

  • निव्वळ नफा ६०३ कोटी

  • स्वनिधी ६०४६ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : सिया लग्न मोडून प्रियकरासोबत पळून का गेली नाही? चेतनने पोलीस तपासात सांगितले धक्कादायक सत्य

२ वर्षांच्या चिमुकल्याला २५ वेळा चावा, २० मिनिटं मारहाण, एकाने केल्या उलट्या; प्ले स्कूलमधील संतापजनक प्रकार

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

संसदेत खळबळ! 26 बंडखोर खासदारांच्या भवितव्यावर सभापती घेणार निर्णय, दोन-तृतीयांश बहुमत असूनही खासदारकी धोक्यात?

Sindhudurg-Ratnagiri Rain : पुढील 4 दिवस धोक्याचे! मुंबई वेधशाळेचा 'या' भागांना मोठा इशारा; वारे ताशी 40 किमी वेगाने वाहणार, आज आणि उद्या यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT