MSC bank sakal
पुणे

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; १३.५० टक्के उच्चांकी बोनसचे वाटप

महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा गेल्या दोन दशकांतील उच्चांकी १३.५० टक्के बोनस जाहीर झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा गेल्या दोन दशकांतील उच्चांकी १३.५० टक्के बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात बोनस जमा केला आहे. त्यामुळे राज्य बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

यंदा २०२२-२३ वर्षात राज्य सहकारी बँकेने ६०९ कोटी रुपयांचा विक्रमी नफा कमावला आहे. बँकेचे नक्तमूल्य चार हजार १०० कोटींच्या वर गेले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या निधीची गुंतवणूक करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने बँकेस नुकतेच पात्र ठरविले आहे. बँकेचा स्वनिधी सात हजार १०० कोटींवर गेला असून, आशिया खंडातील सर्वात सक्षम राज्य बँक म्हणून बँकेने नावलौकीक मिळवला आहे.

२०१७-१८ मध्ये बँकेचा प्रति कर्मचारी व्यवसाय २६ कोटी रुपये होता. तो आज ७३ कोटींवर पोचला आहे. यावरुन बँकेच्या वाढीमधील कर्मचाऱ्यांचे योगदान अधोरेखित होते. याची जाणीव ठेवत प्रशासनाने २०१७-१८ मध्ये जाहीर केलेल्या ९ टक्के बोनसमध्ये दरवर्षी वाढ करत तो चढत्या क्रमाने यंदा १३.५० टक्के बोनस जाहीर केला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट -

सामाजिक बांधिलकी व नैतिकतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही प्रत्येकी १० हजार रुपयांची दिवाळी भेट दिली आहे. बोनसची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

संस्थेच्या यशात कर्मचाऱ्यांचा वाटा मोठा आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारून राज्य सहकारी बँकेच्या प्रशासनाने नेहमीच सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातून राज्य बँकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी दरवर्षी अधिकाधिक गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

- विद्याधर अनास्कर, प्रशासक- महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT