पुणे

वरिष्ट महिला गट टी-२० क्रिकेट

CD

फोटो ः तेजल हसबनीस
गौतमी नाईक

महाराष्ट्राकडून जम्मू काश्मीर संघाला पराभवाचा धक्का
वरिष्ट महिला गट टी-२० क्रिकेट

पुणे, ता. ५ ः ‘बीसीसीआय’च्या वतीने सुरत येथे सुरू असलेल्या एलिट ‘अ’ गटाच्या वरिष्ट महिला गट टी-२० साखळी क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने जम्मू काश्मीर संघाचा १४१ धावांनी दणदणीत पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा तेजल हसबनीस, गौतमी नाईकने केलेल्या अर्धशतकाचा होता.
सी. के. पिठावाला मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या महाराष्ट्राने १०.०५ च्या सरासरीने चार बाद २०१ धावा केल्या यावेळी सलामीची फलंदाज गौतमी नाईकने २५ चेंडूत सात चौकार व तीन षटकारासह ५४ धावांची, तेजल हसबनीसने ४२ चेंडूत पाच चौकार व तीन षटकारासह ६४ धावांची तर अनुजा पाटीलने ३६ चेंडूत सहा चौकारासह केलेली नाबाद ४९ धावांची खेळी उपयुक्त ठरली. यावेळी गौतमी नाईक व तेजल हसबनीस या जोडीने दुसऱ्या विकेटकरिता २७ चेंडूत ५५ धावांची, तर तेजल हसबनिस व अनुजा पाटील या जोडीने ५५ चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली होती.
प्रत्यूत्तर देताना जम्मू काश्मीर संघाला नऊ बाद ६० धावा करता आल्या त्यांच्या रुद्राक्षी चीब (१८), बिस्मा हसन (नाबाद १२) व संध्या (१०), या तिघीच दोन आकडी धावा करू शकल्या. देविका वैद्य तीन, तर भक्ती मिरजकर आणि श्रद्धा पोखरकरने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या स्पर्धेत महाराष्ट्राचा सहा सामन्यातील चौथा विजय असून त्यांचा सातवा व अखेरचा साखळी सामना उद्या (ता. ६) गोवा संघाबरोबर लालभाई कॉन्ट्रक्टर मैदानावर होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः
महाराष्ट्र - (२० षटकांत) ४ बाद २०१ (तेजल हसबनीस ६४, गौतमी नाईक ५४, अनुजा पाटील नाबाद ४९, मारिया नूरन १-१६, चित्रा जयस्वाल १-३२, संध्या १-३५, रूबिया सय्यद १-४५) विजयी विरुद्ध जम्मू काश्मीर - (२० षटकांत) ९ बाद ६० (रुद्राक्षी चीब १८, देविका वैद्य ३-६, श्रद्धा पोखरकर २-५, भक्ती मिरजकर २-२२, ईशिता खळे १-८)
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा! ईडीची केस बंद; प्रकरण काय?

Pune Crime: पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकीकडे ८७ लाखांची सायबर फसवणूक, तर दुसरीकडे लाखोंचे दागिने अन् रोकड लंपास

Pune News: सकाळी साडेअकराची बैठक थेट दुपारी चारनंतर! पुणे महापालिकेच्या स्थायी समितीवर विरोधी पक्षनेते निलेश निकम यांची टीका

Success Story: दिवसा शिक्षण, रात्री सफाईचे काम; जिद्दीने मिळवली सूक्ष्मजीवशास्त्राची पदवी, कोथरूडच्या रेश्माचा प्रेरणादायी प्रवास..

Gangapur News: अंगणवाडी सेविका अंजली तूपलोंढे यांच्या निधनाने हळहळ; आमदार प्रशांत बंब यांनी कुटुंबीयांचे घरी जाऊन केले सांत्वन

SCROLL FOR NEXT