मुंबई, ता. १० : ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२५’ अंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत गुरुवार (ता. १३) पर्यंत वाढविली आहे. संकेतस्थळावरील भार लक्षात घेऊन उमेदवारांना अडचणी येऊ नयेत यासाठी ही मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांनी वाढीव मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण केलेल्या एक लाख ७० हजार १०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे आणि ते लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. सोमवारी सायंकाळी सहापर्यंत मुलाखतीशिवाय एक लाख १० हजार ७६५, तर मुलाखतीसह ९२ हजार ८९४ उमेदवारांचे प्राधान्यक्रम जनरेट झाले आहेत. यापैकी मुलाखतीशिवाय १९ हजार ४४५ उमेदवारांनी तर मुलाखतीसह ७,६७२ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत.
पोर्टलवर लॉगिन करण्यासाठी किंवा प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी ओटीपी आवश्यक आहे. एकाचवेळी मोठ्या संख्येने उमेदवार लॉगिन करीत असल्याने ओटीपी मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे ओटीपी न मिळाल्यास काही काळ प्रतीक्षा करावी आणि तातडीने ‘रिसेंड’वर क्लिक करू नये. उशिराने आलेला ओटीपीही स्वीकारला जातो. काही काळानंतरही ओटीपी न मिळाल्यास ‘रिसेंड’ पर्यायाचा वापर करता येईल.
ओटीपी मिळण्यात अडचण येणाऱ्या उमेदवारांनी वापरत असलेल्या ब्राउझरची हिस्ट्री आणि कॅशे क्लिअर करावी. त्यानंतरही समस्या कायम राहिल्यास ‘इन्कॉग्निटो विंडो’ किंवा ‘प्रायव्हेट विंडो’चा वापर करावा.
आदिवासी विकास विभागाच्या उच्च माध्यमिक विभागातील विज्ञान शाखेच्या बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथेमॅटिक्स या विषयांचे प्राधान्यक्रम इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना विभागाच्या ८ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पत्रानुसार उपलब्ध करून देण्यात येत आहेत. संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.