ajit pawar.jpg 
पुणे

बारामती : पवारांचा गड अभेद्य; सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

बारामती शहर : गेल्या अनेक वर्षात बारामतीकरांनी जे प्रेम दाखवले आहे, ते प्रेम याही निवडणुकीत त्यांनी कायम ठेवले, मला विक्रमी मताधिक्‍याने विजयी करून बारामतीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला पात्र राहून विकास काम अधिक वेगाने करण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी विजयानंतर दिली. 

दरम्यान, बारामतीत प्रामुख्याने भाजप उमेदवरांसह सर्वच उमेदवारांचे डिपाॅझिट जप्त झाले आहे. त्यामुळे यातून एक सिद्ध हाेत आहे की, पवारांचा गडाला काेणीही सुरूंग लावू शकत  नाही. भाजपने अनेकदा प्रयत्न करून देखील भाजपला पवारांचा गड भेदता आला नाही. बारामती मतदार संघातून गाेपीचंद पडळकर यांचा माेठा पराभव झाला आहे.      

एक लाखाहून अधिक मताधिक्‍य झाल्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून जी परंपरा चालत आलेली आहे, तीच परंपरा बारामतीकरांनी कायम ठेवत मला सातव्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदारांचे मी आभार व्यक्त करतो ,अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सातव्यांदा विधानसभेत जात असल्यामुळे माझ्यावरची जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे , पुढील पाच वर्षामध्ये बारामतीची राहिलेली विकासकामे वेगाने मार्गी लावण्यास, सोबतच नवीन विकासाचे प्रकल्प बारामतीत आणण्याच्या दृष्टीकोनातून माझा स्वतःचा प्रयत्न असेल, असे अजित पवार म्हणाले.

उमेदवारी अर्ज भरतानाच एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता . त्याप्रमाणे बारामतीकरांनी ही त्यांच्या विश्वासाला साथ देत अजित पवार यांना एक लाखाहून अधिक मताधिक्‍य दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT