Yuti-Aghadi
Yuti-Aghadi 
पुणे

Vidhan Sabha 2019 : आघाडीत आलबेल; युतीत बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा

विधानसभा 2019 : पुणे - भाजप- शिवसेना युतीच्या नेत्यांना शर्थीचे प्रयत्न करूनदेखील शिवसेनेतील बंडखोर वाघांना शांत करण्यात अखेर अपयश आले. याउलट काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी एकजूट दाखवत पक्षातील बंडखोरांची मनधरणी करण्यात यश मिळविले, त्यामुळे शहरातील कोथरूड आणि कसबा वगळता अन्य मतदारसंघांत दुरंगी, तर काही मतदारसंघांत तिरंगी लढत होणार आहे. कोथरूडमध्ये दुरंगी आणि कसब्यात चौरंगी लढत होणार आहे.

बंडखोरांना थंड करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून युती आणि आघाडीच्या नेत्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत होती, त्यामुळे काँग्रेस आघाडी आणि युतीच्या नेत्यांच्या बंडखोरांना शांत करण्यासाठी कालपासूनच जोरदार हालचाली सुरू होत्या. त्यामध्ये काँग्रेस आघाडीला शंभर टक्के यश आले, तर भाजप- शिवसेना युतीला मात्र बंडखोर रोखण्यात शंभर टक्के यश मिळविता आले नाही.

धनवडेंची उमेदवारी कायम
शहरातील आठ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांत भाजपच्या, तर काही मतदारसंघांत शिवसेनेच्या नेत्यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरांना शांत करण्यासाठी महापौर बंगल्यावर भाजप आणि शिवसेना नेत्यांची एकत्रित बैठक आज सकाळी झाली. बंडखोरांशी संपर्क साधून, प्रसंगी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करून समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात येत होते.

खडकवासला मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, भोर मतदारसंघातील भाजपचे बंडखोर नगरसेवक किरण दगडे, तर पुणे कॅंटोन्मेंटमधून शिवसेनेच्या नगरसेविका पल्लवी जावळे, भाजपच्या अनुसूचित जाती-जमाती मोर्चाचे शहराध्यक्ष डॉ. भरत वैरागे, वडगावशेरी मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक संजय भोसले यांची समजूत काढण्यात यश आले. पक्षाने नेतेमंडळी पाठवून या बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास लावले. परंतु कसबा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसवेक विशाल धनवडे आणि पिंपरी मतदारसंघातील राहुल कलाटे या सेनेच्या उमेदवारांची बंडखोरी रोखण्यात युतीच्या नेत्यांना अपयश आले.

धनवडे हे कालपासूनच फोन बंद करून गायब झाले होते. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न युतीच्या नेत्यांनी केला, तसेच घरीदेखील कार्यकर्ते पाठविण्यात आले. परंतु धनवडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, त्यामुळे धनवडे यांची उमेदवारी कायम राहिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT